नाशिक

शासकीय जमिनींवर भूमाफियांचा ताबा

आमदार देवयानी फरांदे यांची कठोर कारवाईची मागणी

नाशिक ः प्रतिनिधी
नाशिक शहरातील शासकीय जमिनींवर वाढत्या अतिक्रमणाच्या प्रकारांबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी जिल्हाधिकारी नाशिक व पोलीस आयुक्त नाशिक यांना सविस्तर निवेदन देत तातडीने चौकशी व फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. नाशिक तहसील अंतर्गत नाशिक-3 विभागातील सर्व्हे नं. 1042/2 व सर्व्हे नं. 1056 या दोन्ही जमिनींवर भूमाफियांनी बेकायदेशीर ताबा घेतल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
आमदार फरांदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व्हे नं. 1042/2 ही जमीन महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असून, मालकी सदरीमध्ये सरकार अशी स्पष्ट नोंद आहे. असे असताना काही व्यक्तींनी सदर जागेवर अनधिकृत ताबा घेतला असून, वॉल कंपाउंडचे बांधकाम केले आहे. इतकेच नव्हे तर संबंधितांनी स्वतःचे नाव जागामालक म्हणून फलकावर दर्शविले असल्याची बाब उघडकीस आली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, शासकीय मालमत्तेवर खुलेआम अतिक्रमण होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
सध्या नाशिक अपर तहसील कार्यालयासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्यामुळे कार्यालयीन कामकाजात अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्व्हे नं. 1042/2 ही शासकीय जमीन अपर तहसील कार्यालयासाठी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणीही आमदार फरांदे यांनी केली आहे. प्रशासनाच्या दृष्टीने ही जागा अत्यंत उपयुक्त असून, नागरिकांच्या सोयीसाठी येथे कार्यालय उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी
स्पष्ट केले.
याचप्रमाणे सर्व्हे नं. 1056 या शासकीय जमिनीवरही भूमाफियांनी बेकायदेशीररीत्या ताबा घेत बांधकाम केले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, संबंधितांनी महावितरण कंपनीच्या काही अधिकार्‍यांशी संगनमत करून या ठिकाणी विद्युत मीटर मंजूर करून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून वीजजोडणी मिळविणे हा कायद्याचा उघड उघड भंग असून, यातून शासनाचे आर्थिक व कायदेशीर नुकसान होत असल्याचे आमदार फरांदे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधित भूमाफियांवर तसेच त्यांना मदत करणार्‍या व संगनमत करणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, शासकीय जमिनीवरील बेकायदेशीर ताबा तात्काळ हटविण्यात यावा व जमीन मूळ शासकीय ताब्यात देण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे.

Land mafias take control of government lands

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

11 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

11 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

11 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

11 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

11 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

11 hours ago