लासलगाव बाजार समितीसाठी दुपारी १२ वाजेपर्यंत ३३.२८ टक्के मतदान
लासलगाव प्रतिनिधी
आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे.सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत एकूण २२९३ मतदारांपैकी ७६३ मतदारांनी मतदान केले असून,३३.२८ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी शरद घोरपडे यांनी दिली
जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक शाळा,जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र,जिल्हा परिषद समूह साधन केंद्र लासलगाव या ठिकाणी मतदान घेतले जात आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी शरद घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ वाजता मतदान घेण्यास सुरुवात करण्यात आली.
यावेळी शेतकरी विकास पॅनल तसेच शेतकरी पॅनल व अपक्ष उमेदवारांनी मतदान केंद्राच्या आवारात मोठी गर्दी केली आहे.यावेळी मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना उमेदवार हात जोडून विनती करताना दिसत होते.या वेळी लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…