नाशिक

नऊ दिवसांच्या सुट्टी नंतर लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु

लासलगाव:  प्रतिनिधी

दिवाळीच्या नऊ दिवसांच्या सुट्टी नंतर आज लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु होताच कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे बघयाला मिळाले.जिल्ह्यातील सर्वच बाजार समितिमध्ये आज उन्हाळ कांद्याला समाधानकारक भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दिवाळी पुर्वी शुक्रवारी २१ तारखेला लासलगांव बाजार समितीमध्ये ऊन्हाळ कांद्याची १४ हजार ७९२ क्विंटल आवक झाली होती तर बाजारभाव कमीत कमी ६००/- रु,जास्तीत जास्त २३५० रू तर सरासरी १८६० रू प्रती क्विंटल होते.तर दिवाळीनंतर आज दि.३१ तारखेला लासलगांव बाजार समितीमध्ये ऊन्हाळ कांद्याची सकाळच्या सत्रात ५७० नगाची आवक झाली. बाजारभाव कमीत कमी १०११/- रू,जास्तीत जास्त ३१०१ रु तर सरासरी रू २४५०/- रु प्रती क्विंटल होते.

परतीच्या पावसाचा कांदा रोपांना तडाखा बसल्याने नवीन लाल कांद्याच्या हंगाम यंदा लांबणीवर पडला आहे.साठवणुकीचा कांदाही कमीच असल्याने दरवाढीची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, या दरवाढीचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किती प्रमाणात मिळणार,याबाबत प्रश्नचिन्हच आहे.सध्या बाजारात जुना कांदा उपलब्ध आहे.जुन्या कांद्याचा साठा संपत चालला आहे.पावसामुळे चाळीत साठविलेल्या जुन्या कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे.

 

 

कांदा भाव वाढीचा फायदा खूपच कमी शेतकऱ्यांना होत आहे.चाळीत साठवलेला कांदा हवामान बदलामुळे सडला असून त्याचे वजन देखील कमी झाले आहे.गेली पाच महिने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी अतिशय स्वस्तात कांदा विक्री केला आहे.मात्र आता शेतकऱ्यांचा कांदा संपत आला असताना कांद्याच्या भावात वाढ झाली आहे.यामुळे वाढलेल्या दराचा खूपच कमी शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

राजा बाबा होळकर

कांदा उत्पादक शेतकरी लासलगाव

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

2 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

2 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

2 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

3 hours ago