घोटी : प्रतिनिधी
येथील भवानी मंदिराजवळ वाडीवर्हे- सांजेगाव, मुरंबी, मोडाळे रस्त्यावर दुचाकीने जाणार्या मुरंबी येथील दोन तरुणांंवर बिबट्याने झेप घेऊन हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले.
वाडीवर्हेजवळील भवानी मंदिराच्या मागील बाजूला मुरंबी- सांजेगाव रस्त्याने धनंजय संजय शिंदे (वय 30), उत्तम मोहन शिंदे (30) दुचाकीवरून जात होते. या दोन तरुणांंवर बिबट्याने प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केले. सुदैवाने मागून येणार्या डॉ. योगेश मते यांच्या चारचाकी वाहनाच्या आवाजामुळे बिबट्या पसार झाला.
दरम्यान, बिबट्याने झेप घेतल्यामुळे दुचाकीस्वारांची दुचाकी नाल्यात पडली. बिबट्याने धनंजय याला तोंडात धरून ओढून नेण्याचा प्रयत्न केला. या झटपटीत तरुणाच्या हाताला व पायाला बिबट्याने चावा घेतल्याने जखमा झाल्या आहेत. दुसरा तरुण उत्तम गाडीवरून पडल्याने किरकोळ जखमी झाला. दोन्ही जखमींंना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दैव बलवत्तर म्हणून दोन्हीही तरुण या हल्ल्यातून बचावले. वन विभागाने परिसरात पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…