सीसीटीव्हीत घटना कैद; नागरिकांच्या मागणीनंतर वन विभागाकडून पिंजरा
सिडको : प्रतिनिधी
विल्होळी परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आला आहे. गुरुवारी (दि.8) पहाटे शेतातील बंगल्याच्या दाराजवळ झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे.
बिबट्याचा थेट शेतातील घराजवळ वावर आढळल्याने परिसरातील शेतकरी व रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, स्थानिक नागरिक आणि शेतकर्यांच्या मागणीनंतर वन विभागाने घटनास्थळाजवळ पिंजरा लावला आहे.
विल्होळी येथील शेतकरी दामू थोरात यांचा शेतात बंगला आहे. गुरुवारी (दि. 8) पहाटे सुमारे तीनच्या सुमारास बिबट्या बंगल्याच्या परिसरात आला.
दाराजवळ झोपलेल्या कुत्र्यावर त्याने अचानक झडप घातली. या हल्ल्यात कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यानंतर बिबट्या शेताच्या दिशेने निघून गेल्याचे सीसीटीव्ही चित्रणात दिसून आले. बंगल्याच्या परिसरात लावलेल्या कॅमेर्यांमध्ये बिबट्याचा वावर आणि कुत्र्यावर केलेला हल्ला स्पष्टपणे नोंदला गेला आहे. या घटनेमुळे विल्होळी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
विल्होळी परिसरात मोठ्या प्रमाणावर शेती असून, अनेक शेतकरी शेतातील घरांमध्ये राहतात. शेतीची कामे आणि अन्य कारणांसाठी शेतकरी तसेच शेतमजुरांना पहाटे व रात्रीच्या वेळी घराबाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत बिबट्याचा शेतातील बंगल्यापर्यंत वावर आढळल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची दखल घेत वन विभागाने परिसराची पाहणी केली.
स्थानिक रहिवासी आणि शेतकर्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार दामू थोरात यांच्या बंगल्याजवळ पिंजरा लावण्यात आला आहे.
Leopard on the rampage in Vilholi; kills a dog.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…