जेजुरकर लॉन्स मध्ये बिबट्याचा मुक्त संचार
पंचवटी : प्रतिनिधी
शहरात बिबट्याचा वावर वाढल्याचे चित्र बघायला मिळत असून सोमवार ( दि.२२) रोजी रात्रीच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर रोडवरील तपोवन परिसरातील जेजुरकर लॉन्स मध्ये बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कैद झाला आहे. त्यामुळे याभागात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले असून परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन सामजिक कार्यकर्ते समाधान जेजुरकर केले आहे.
पंचवटी परिसरातील तपोवनातील बराचसा भाग शेतमळे परिसर आहे. छत्रपती संभाजीनगर रोड जनार्दन स्वामी चौक चौफुली कडून टाकळी कडे जाणारा मार्गावर जेजुरकर मळा आहे. या मार्गाहून नागरिक जॉगिंग , शतपावली साठी जात असतात. तसेच या ठिकाणी जेजुरकर लॉन्स आहे, सोमवार (दि.२२) रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास या लॉन्समध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता. सदर संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेजुरकर मळा परिसरात राहणारे नागरिक, तसेच या मार्गाहून मार्गक्रमण करणारे, दुचाकी चालक, शतपावली करणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त समाधान जेजुरकर यांनी केले आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…