नाशिक

महागाई वाढल्याने सामान्य नागरिकांच्या आर्थिक नियोजनावर ताण

दूध, खाद्यतेल, इंधनाचे दर वाढले; भाजीपाल्याच्या भावात मोठी वाढ

नाशिक : प्रतिनिधी
गेल्या महिनाभरात महागाई वाढल्यामुळे नागरिकांच्या आर्थिक नियोजनावर ताण पडत आहे. भाज्या, दूध, खाद्यतेले व इंधनाचे दर वाढलेले आहेत. विशेष म्हणजे, दूध, दही, ताक, पनीर यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही वाढ झाली आहे. महागाईमुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना दैनंदिन खर्च भागवणे कठीण होत चालले आहे.
नाशिक हा कांदा व भाजीपाला पिकविणारा जिल्हा असतानाही शहरातील बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सर्वसामान्य नागरिक म्हणत आहेत की, अत्यावश्यक वस्तू, किराणा, भाज्या, दूध, खाद्यतेल व इंधनाचे दर वाढल्यामुळे आमच्या खर्चात मोठी वाढ झालेली आहे. भाज्यांचे 10 ते 20 टक्के दर वाढले आहेत. दूध व दुग्धजन्य पदार्थ 5 ते 10 टक्क्यांनी वाढले. इंधन म्हणजे पेट्रोल, डिझेल 3 ते 5 टक्क्यांनी वाढले. सध्या भाज्यांचे भाव असे : कांदा 20 रुपये किलो, टोमॅटो 40 रुपये, बटाटे 30 रुपये, वांगे 100 रुपये, घेवडा 80 रुपये, मिरची 100 रुपये, गाजर 60 रुपये किलो, तसेच कोथिंबीर 20 रुपये जुडी, मेथी 20 रुपये जुडी. पालेभाज्यांचे भाव मात्र कमी झाले आहेत.

आता बाजारात गेले की, पैसे जास्त खर्च होतात. त्यामुळे जीवनमानावर ताण जाणवत आहे. एखादी वस्तू घेण्यासाठी आधीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप त्रास होत आहे. – कुणाल सांगळे, ग्राहक

गेल्या काही महिन्यांत बाजारात प्रत्येक वस्तूचे भाव वाढलेले दिसतात. आधी एक हजार रुपयांत आठवड्याची खरेदी होत होती. आता त्याच गोष्टीसाठी 1400 ते 1500 रुपये लागतात. वाढत्या महागाईमुळे माहिन्याच्या शेवटी बजेट हाताबाहेर जाते. त्यामुळे घरगुती जीवनावर ताण वाढत आहे.
– प्रिया बोडके, गृहिणी

घर चालवणे आता खूप अवघड झाले आहे. महागाईमुळे खर्चात 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. सगळं खूप महाग झालं आहे. घर चालवणे कठीण होत आहे. आधीपेक्षा खर्च खूप वाढलाय. सामान्य माणसाने घर कसे चालवावे, असा प्रश्न पडला आहे. शहरातील वाढती महागाई ही केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक समस्या बनत चालली आहे.
– शंकर टाळकुटे, नागरिक

Rising inflation puts pressure on the financial planning of ordinary citizens
 
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago