माळेगाव औद्योगिक वसाहतीत बिबट्याचा वावर?

एचपी गॅस कंपनीत वन विभागाची पाहणी; तीन पिंजरे लावलेे

सिन्नर : प्रतिनिधी
माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एचपी गॅस कंपनीच्या आवारात मंगळवारी (दि. 15) बिबट्या दिसल्याची माहिती दूरध्वनीद्वारे वन विभागाला मिळाली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
वनपाल तान्हाजी भुजबळ, वनरक्षक देशवंडी दीपाली सदावर्ते, वनरक्षक जेजीराम चौरे तसेच एमआयडीसी पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व वनकर्मचार्‍यांनी कंपनी परिसराची काटेकोरपणे पाहणी केली. मात्र, पाहणीदरम्यान बिबट्याच्या वावराचे कोणतेही ठोस पुरावे अथवा अन्य बाबी निदर्शनास आल्या नाहीत. दरम्यान बिबट्याने संरक्षक भिंत ओलांडून कंपनीत प्रवेश केला होता. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून तसेच बिबट्याचा वावर असल्यास त्याचा शोध घेण्यासाठी कंपनीच्या आवारात वन विभागाकडून तीन ट्रॅप पिंजरे लावण्यात आले आहेत.
वन विभागाकडून परिसरावर लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leopard spotted in Malegaon Industrial Estate?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *