सध्या एक्यूआय अर्थातच ’एअर क्लॉलिटी इंडेक्स’ आणि त्यावरील आकडेमोड मीडियातील सर्वांत महत्त्वाची बातमी बनवून राहिली आहे. विशेषतः दिवाळीच्या दिवशी भारतातील हवा प्रचंड प्रदूषित झाली आणि दिल्लीसहित भारतातील 30 पैकी 29 शहरे प्रचंड प्रदूषित शहरांच्या यादीत आली. यातील दिल्लीतील एअर क्लॉलिटी इंडेक्स तर दिवाळीच्या दिवशी विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या वेळी तीन हजाराची पातळी ओलांडून वर गेला आणि संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वेधले गेले.
नाशिकचा विचार केल्यास दिवाळीपासून नाशिकचा एअर क्लॉलिटी इंडेक्स 300 ते 1000 च्या वरच राहिला असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्यासाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच जंगलांची होणारी तोड, त्यातून निर्माण झालेला जनक्षोभ आणि त्यात भरीसभर म्हणून की काय, उच्च न्यायालयाचे आदेश धुडकावून लावत दिवाळीत मोठ्या प्रमाणात आतषबाजी झाल्याने एअर क्वॉलिटी इंडेक्स धोकादायक पातळी ओलांडून वर गेला.
अर्थातच दिवाळीआधी काही महिने अंदमान-निकोबारमधील ग्रेट निकोबार बेटातील प्रास्ताविक विकास प्रकल्पातून होऊ घातलेली अंदाजे काही लाख झाडांची जंगलतोड व त्याला काँग्रेसप्रणीत विशेषतः राहुल गांधींनी केलेल्या विरोधाचे प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमधील वृक्षतोडीचा विषय ऐरणीवर आला. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रास्ताविक 3000 मेगावॉट क्षमतेच्या ’पंप्ड स्टोरेज जलविद्युत’ प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 32 हजार 490 झाडे तोडण्याची परवानगी मिळाली. या प्रकल्पासाठी लागणार्या सुमारे 233 हेक्टर वनजमिनीचा मुद्दा अभिनेते सयाजी शिंदे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे समोर आला, तसेच या प्रकल्पातून होणारी वृक्षतोड ऐरणीवर आली. या सर्व प्रकल्पांमधून होणार्या वृक्षतोडीतून भारतातील पर्यावरणाची एक प्रकारे ’वाट’ लागणार असल्याने या प्रकल्पांना प्रचंड विरोध सुरू असतानाच दिवाळीत प्रदूषणरूपी दानवाने धुमाकूळ घातला! खरेतर दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा आणि उत्साहाचा सण आहे; परंतु फटाके वापरण्याच्या आधुनिक संस्कृतीमुळे या काळात पर्यावरणाला प्रदूषणाचा मोठा फटका बसतो. फटाक्यांचा इतिहास पाहिल्यास फटाक्यांचा शोध चीनमध्ये लागला, तर मुघलांनी भारतात फटाके वाजवण्याची प्रथा आणल्याचे सांगितले जाते. आज हीच प्रथा जनसामान्यांमध्ये रूढ झाली असून, प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे.
मोठ्या प्रमाणावर धूर, धूलिकण आणि फटाक्यांतून निघणारे विषारी वायू मिसळून हवेची गुणवत्ता खालावते. भारतात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीओपीडी) अधिकृत एक्यूआय मापन पद्धतीत
निर्देशांकाची श्रेणी शून्य ते पाचशे आहे.दिवाळीत दिल्लीतील काही ठिकाणी झच् 2.5 या अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात म्हणजेच पाच हजार मायक्रोन प्रति घनमीटर नोंदवले गेले (4,985 गस/ाक, जहांगीरपुरी, दिल्ली). गस/ाक (मायक्रोन प्रति घनमीटर) हे हवेतील प्रदूषकांचे प्रमाण मोजण्याचे एकक आहे. 2.5 मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी व्यासाचे अतिसूक्ष्म धूलिकण असतात. हवेतील प्रदूषकांचे प्रमाण मोजण्यासाठी मायक्रो ग्रॅम प्रति घनमीटर हे युनिट वापरतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास मायक्रो ग्रॅम हे वजन मोजण्याचे अतिशय लहान एकक असून, एक मायक्रोग्रॅम म्हणजे एक ग्रॅमचा दहा लाखावा भाग, तर घनमीटर म्हणजेच एक मीटर लांब, एक मीटर रुंद व एक मीटर उंची एवढे हवेचे घनफळ होईल. उदाहरणासहित समजून घ्यायचे असल्यास समजा हवेतील पीएम 2.5 चे प्रमाण 100 असल्यास त्याचा अर्थ असा की, एक घनमीटर हवेत 100 मायक्रोग्रॅम वजनाचे झच् 2.5 वजनाचे धूलिकण असतात. ते अतिसूक्ष्म असल्याने डोळ्यांना दिसत नाहीत. मात्र, श्वसनावाटे फुफ्फुसाच्या खोल भागात ते पोहोचून रक्ताभिसरण व्यवस्थेवर परिणाम करतात. याचे मानवी शरीरावर घातक परिणाम होतात. दिवाळीतील प्रदूषणामुळे डोळे, नाक, घसा, हृदय व मेंदू आदींवर गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम होतात. महत्त्वाचे म्हणजे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. अशा पद्धतीच्या प्रदूषित हवेत सतत राहिल्यास ’कॅन्सर’सारख्या भयानक आजाराचा संभाव्य धोकाही वाढतो. अर्थातच एअर क्वॉलिटी इंडेक्स हा 0 ते 50 आरोग्यासाठी उत्तम, तर 300 ते 500 धोकादायक असा असतो. सध्या तो किती भयानक स्तरावर गेलाय ते आपण वर पाहिलेच आहे. अमेरिकेत हा एक्यूआय 50 च्या आतच आढळतो. भारतात त्याला गांभीर्याने घेतले जात नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. कोर्टाने राज्य सरकारांना दिलेल्या निर्देशानुसार सरकारकडून जनहिताची जाहिरात करून खानापूर्ती केली गेली.
Let’s understand the AQI during Diwali…
- अश्विनी पांडे निसर्गाची मुक्त उधळण, आल्हाददायी हवामान, हिरवळ आणि तुलनेने शुद्ध हवा ही नाशिकची…
- गोरख काळे येत्या महासभेत स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा सोपस्कार पार पडणार असून, महापौर हिमगौरी आहेर-आडके…
अन्यायाविरुद्ध पेटलेला स्वाभिमानाचा अग्निकुंड! - ग्रीष्मा नागमोती ज्या भूमीवर पिढ्यान्पिढ्या वास्तव्य केले, ज्या जंगलांनी जगण्याचा…
दुष्काळावर मात करणारा जलसंधारणाचा ’पेठ पॅटर्न’ - देवयानी सोनार यंदा पावसाची अवकृपा झाल्याने नाशिक जिल्ह्यातील…
आशिया खंडातील पश्चिम भागात असलेला इस्रायल हा एक छोटा देश आहे. पॅलेस्टाइनवरील ब्रिटिश राजवट संपुष्टात…
दिवाळीनंतर ’बॉडी डिटॉक्स’पेक्षा ‘संतुलित आहारा’ची गरज नाशिक : प्रतिनिधी आकाशकंदिलांचा झगमगाट, पणत्यांची आरास आणि फराळाच्या…