नाशिक

सात हॉटेल्सचे परवाने निलंबित

नाशिक : प्रतिनिधी
राज्यातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत नाशिक विभागाने प्रभावी कारवाई केली आहे. दोन दिवसांत नाशिक विभागातील 20 हॉटेल व खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यांपैकी अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन करणार्‍या सात आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तत्काळ निलंबित केलेे. पूर्वीच्या सुधारणा नोटिशींचे पालन न केल्याने आणखी दोन आस्थापनांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. तपासणीदरम्यान अनेक आस्थापनांमध्ये स्वयंपाकघरातील गंभीर अस्वच्छता, निकृष्ट दर्जाची शीतकरण व्यवस्था, उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्न, कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव, वैद्यकीय तपासणी न केलेले कर्मचारी, आवश्यक कागदपत्रांची अनुपलब्धता तसेच ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेचा अभाव आढळला.
या तपासणीदरम्यान चार आस्थापनांकडे वैध अन्न व्यवसाय नोंदणी किंवा परवाना नसल्याचेही आढळले. या आस्थापनांना आवश्यक नोंदणी किंवा परवाना मिळेपर्यंत अन्न व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत.

तपासणीत आढळलेल्या प्रमुख त्रुटी
स्वयंपाकघरात गंभीर अस्वच्छता.
निकृष्ट शीतकरण व्यवस्था.
उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्न.
कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव.
कर्मचार्‍यांची वैद्यकीय तपासणी नसणे.
आवश्यक परवाने व कागदपत्रांचा अभाव.
ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा नसणे.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील नियमांचे उल्लंघन.

परवाने निलंबित
नाशिकमधील हॉटेल ग्रीन वॉल (जत्रा लिंक रोड, पंचवटी), हॉटेल राधिका (द्वारका) आणि हॉटेल क्राउन पॅलेस (पेठरोड, पंचवटी), जळगावमधील हॉटेल त्रिमूर्ती (एमआयडीसी) व हॉटेल भानू, नंदुरबारमधील जाधव रेस्टॉरंट, तसेच सिन्नरमधील लक्ष्मी हॉटेल यांचे अन्न व्यवसाय परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले. याशिवाय, पूर्वी देण्यात आलेल्या सुधारणा नोटिशीतील त्रुटी निर्धारित मुदतीत दूर न केल्याने भुसावळ येथील हॉटेल जय आणि धुळे येथील गजानन कॅन्टीन (मेडिकल कॉलेज कॅम्पस) यांचेही परवाने निलंबित करण्यात आले.

नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍या कोणत्याही व्यावसायिकाला सवलत दिली जाणार नाही. विशेष तपासणी मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने आणि अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे.
– मंगेश माने, नाशिक विभाग सहआयुक्त (अन्न)

Licenses of seven hotels suspended

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago