नाशिक

पावसानंतर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था

चिखल, खड्ड्यांमुळे वाहनांची घसरगुंडी

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात विविध विकासकामे युद्धपातळीवर सुरू आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि भूमिगत केबल टाकण्यासाठी अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, खोदकामानंतर रस्त्याच्या कडेला टाकलेली माती, अपूर्ण दुरुस्ती आणि निकृष्ट तात्पुरत्या भरावामुळे गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था उघड झाली आहे. रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांसमोर जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गंगापूर रोडवरील हरिओम ढाब्याजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने अनेक दुचाकी घसरल्याच्या घटना घडल्या. रस्त्यावर माती वाहून आल्याने वाहनांचा तोल (बॅलन्स) जात आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
द्वारका ते नाशिकरोड या नव्याने विकसित करण्यात आलेल्या रस्त्यालगतही चिखल साचल्याने वाहने घसरत आहेत. रस्त्याच्या कडेला टाकलेली माती पावसाच्या पाण्यासोबत मुख्य रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव या मार्गावर परिस्थिती अधिक गंभीर आहे. या मार्गावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून रस्त्यावर तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. अंबड एमआयडीसीत मोठ्या प्रमाणावर खड्डे व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्डयांत पाणी साचत असल्याने वाहनधारकांना त्याचा अंदाज येत नाही. परिणामी अनेक दुचाकीस्वार घसरून पडत असून, किरकोळ अपघात सातत्याने घडत आहेत. शालेय विद्यार्थी, नोकरदार व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सिंहस्थासाठी सुरू असलेल्या विकासकामांचे नियोजन योग्य असले, तरी काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, चिखल हटविणे आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या
रस्त्यांवरील चिखल तातडीने हटवावा.
साचलेल्या पाण्याचा तत्काळ निचरा करावा.
खोदकामानंतर रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी.
खड्डे तातडीने बुजवून रस्ते समतल करावेत.
विकासकामांच्या ठिकाणी बॅरिकेड्स, सूचनाफलक व रात्री परावर्तित चिन्हे लावावीत.
अपघातप्रवण ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी.

अपघातांचा वाढता धोका
गंगापूर रोडवरील हरिओम ढाब्याजवळ चिखलामुळे दुचाकी घसरण्याच्या घटना.
द्वारका-नाशिकरोड मार्गावर रस्त्यालगतच्या चिखलामुळे वाहनांचा तोल जात आहे.
पाथर्डी फाटा-पाथर्डी गाव मार्गावर खड्डयांत पाणी साचल्याने अपघात.
पावसामुळे रस्ते घसरडे बनल्याने दुचाकीस्वार सर्वाधिक धोक्यात.
कार्यालयीन वेळेत वाहतूक मंदावून कोंडीची समस्या वाढली.

The deplorable condition of city roads after the rains.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago