पावसापासून बचावासाठी ट्रॉलीखाली घेतला आसरा; काही क्षणांतच घडली दुर्घटना
सिन्नर : प्रतिनिधी
अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी ट्रॉलीखाली थांबलेल्या मजुरांवर वीज कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील निमगाव-सिन्नर येथील रुपाळ मळ्यात मंगळवारी (दि. 22) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. जगदीश जाडीया (40, रा. सेंधवा, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे.
खिलारसिंग कुटिया मेहता (40) आणि विक्रम घोटे (50, दोघेही रा. सेंधवा) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर सिन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
योगेश चिंधू सानप यांच्या शेतात टोमॅटो तोडणीसाठी सेंधवा येथून आठ मजूर आले होते. दुपारी अचानक सोसाट्याचा वारा सुटून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मजूर शेतातील ट्रॉलीखाली आडोशाला थांबले. त्याचवेळी अचानक वीज कोसळली. यात जगदीश जाडीया, खिलारसिंग मेहता आणि विक्रम घोटे हे तिघेही बेशुद्ध पडले. स्थानिकांनी तिघांना तातडीने सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जगदीश जाडीया यांना मृत घोषित केले. दोघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गोंदे येथे दि. 22 रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान आलेल्या पावसामध्ये आशाबाई शंकर शिंदे यांची गाय वीज पडून दगावली आहे.
घटनेची माहिती मिळताच मुसळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
Lightning strikes laborers at Nimgaon-Sinnar; one dead, two critically injured.
लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…
कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…
सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…
अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…
महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…