नाताळची धूम : केक शॉपमध्ये खरेदीसाठी गर्दी
नाशिक : वैशाली लिलके
ख्रिसमस अर्थात नाताळ आणि केक यांचे अनोखे नाते आहे. त्यामुळे नाताळसाठी लागणारे विविध प्रकारचे केक सध्या ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे. पारंपरिक प्लम केकबरोबरच आधुनिक फ्लेवर्सच्या केकलादेखील मागणी आहे.
शहरातील लहान-मोठ्या बेकर्यांमध्ये केक तयार करण्यासाठी मोठी लगबग पाहावयास मिळाली. पारंपरिक प्लम केक आजही ग्राहकांच्या पसंतीचा पहिला क्रमांक आहे. मात्र, त्याचबरोबर आधुनिक आणि नव्या फ्लेवर्सच्या केकलादेखील चांगली मागणी आहे.
ख्रिसमस सण म्हटले की, प्लम केक आठवतो. ड्रायफ्रूट्स, मनुका, बदाम, काजू, आक्रोड आणि मसाल्यांचा खास सुगंध असलेला प्लम केक हा अनेक वर्षांपासून नाताळचा भाग राहिला आहे. अनेक कुटुंबांमध्ये आजही परंपरेप्रमाणे प्लम केक आणून नाताळ साजरा केला जातो. त्यामुळे बेकरीचालक सांगतात की, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्लम केकची विक्री अधिक होत आहे.
काळानुसार ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलत चालल्या आहेत. विशेषतः तरुण पिढी आणि लहान मुलांमध्ये चॉकलेट आधारित आणि क्रीम केक्सची पसंती वाढत आहे. यामुळे बेकर्यांमध्ये आता केवळ पारंपारिक केकच नव्हे, तर विविध आधुनिक फ्लेवर्स उपलब्ध करून दिले जात आहेत.
महिला आणि तरुणांमध्ये कस्टमाइज्ड आणि थीम बेस्ड केक्स लोकप्रिय होत आहेत. सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री, स्नोमॅन, स्टार अशा आकारांचे केक ग्राहक खास ऑर्डर देऊन तयार करून घेत आहेत. त्यामुळे बेकर्यांमध्ये केकच्या सजावटीवरही विशेष भर दिला जात आहे.
Likes plum cake, Santa Claus, snowman cake न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…