नाशिक

जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे…

शहरातील चर्च सजले; आज ख्रिस्त बांधवांची प्रार्थना

नाशिक : माधुरी पोटकुळे
नाताळनिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात तयारी आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला चर्च परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. रंगीबेरंगी दिवे, रोषणाई, ख्रिसमस ट्री, फुलांची सजावट व आकर्षक देखावे यामुळे चर्चचा परिसर उजळून निघाला आहे.
ख्रिसमस अर्थात, नाताळ सणाच्या पाश्वर्र्भूमीवर नाशिक शहरातील सर्व चर्च आकर्षक सजावटीने सजले आहेत. शहरात ख्रिश्चन समाजाची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी चर्चमध्ये विशेष तयारी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चची स्वच्छता, सजावट आणि धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनात संबंधित व्यस्त होते. चर्चच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य प्रार्थना सभागृहापर्यंत रंगीत दिव्यांची सजावट करण्यात आली आहे. काही चर्चमध्ये विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर आकर्षक दिसत
आहे.
या चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा, कॅरोल गायन, धार्मिक प्रवचने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बालकांसाठी खास कार्यक्रम ठेवण्यात आले असून, यामध्ये ख्रिसमस गाणी, नाट्यप्रयोग आणि बायबलवरील कथा सादर केल्या जाणार आहेत. यामुळे लहान मुलांमध्येही नाताळ सणाबद्दल उत्सुकता आणि आनंद दिसून येत आहे.

बाजारातही उत्साह

नाताळ सणाच्या निमित्ताने नाशिक शहरातील बाजारपेठेतही चैतन्य निर्माण झाले आहे. ख्रिसमस ट्री, सजावटीचे दिवे, तारे, सांताक्लॉजचे मुखवटे, केक, विविध मिठाई आणि भेटवस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. केकची दुकाने आणि बेकर्‍यांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे. नागरिक आपल्या कुटुंबीयांसह खरेदीसाठी बाहेर पडताना दिसत होते.

Jingle bell jingle bell jingle all the way...

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

21 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

21 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

21 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

21 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

21 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

22 hours ago