सावकार दाम्पत्याच्या धमक्यांनी महिलेने केले विषप्राशन
सिन्नर : प्रतिनिधी
कर्ज म्हणून घेतलेल्या 80 हजार रुपयांच्या बदल्यात तब्बल 4 लाख रुपये वसूल करूनही आणखी 4 लाख 22 हजार रुपयांची मागणी करत सावकार दाम्पत्याने धमकावले. पैसे न दिल्यास महिला व तिच्या मुलीला देहविक्रयाच्या व्यवसायात ढकलण्याची धमकी दिल्याने 37 वर्षीय महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सिन्नर शहरात घडली.
या प्रकरणी सिन्नर पोलिसांनी कांचन जाधव व तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरातील पीडित महिलेने कानडी मळा येथील कांचन जाधव व तिच्या पतीकडून दरमहा 30 टक्के व्याजाने टप्प्याटप्प्याने 80 हजार रुपये घेतले होते. घरखर्च व मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या या कर्जापोटी महिलेने एप्रिलपर्यंत थोडीथोडकी रक्कम देत एकूण 4 लाख रुपये परत केले.
मात्र, एवढी रक्कम दिल्यानंतरही आरोपी दाम्पत्याने आणखी 4 लाख 22 हजार रुपये देणे बाकी असल्याचे सांगून पैशांसाठी तगादा लावला.
या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून महिलेने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर पोलिसांनी कांचन जाधव व तिच्या पतीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम पवार करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पैसे नाही दिले तर कुटुंबाला संपविण्याची धमकी
26 सप्टेंबर रोजी पैशांची जमवाजमव न झाल्याने महिला आरोपींकडे विचारणा करण्यासाठी गेली. त्यावेळी तिला मारहाण करण्यात आली. तिच्या पतीची गच्ची धरून घराबाहेर हाकलून दिल्याचाही आरोप आहे. 28 सप्टेंबरपर्यंत एक लाख रुपये रोख तसेच उर्वरित रकमेचा बाँड लिहून न दिल्यास कुटुंबाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
Loan of ₹80,000; ₹4 lakh repaid—yet a demand for ₹4.22 lakh persists!
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…