पांढरे पट्टे नसल्याने रात्री अपघातांना निमंत्रण; कॅटआयज ब्लिंकर बसविण्याची मागणी
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर-बारागावपिंप्री-शिवरे फाटा मार्गे निफाड जाणार्या राज्य मार्ग क्रमांक 27 वर वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले गतिरोधकच रात्रीच्या वेळी अपघातांना कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने ते अंधारात वाहनचालकांना स्पष्टपणे दिसत नाहीत. त्यामुळे या मार्गावरील सर्व गतिरोधकांवर तातडीने पांढरे पट्टे मारावेत आणि रात्री ते स्पष्ट दिसण्यासाठी कॅटआयज ब्लिंकर बसवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी यांनी
केली आहे.
याबाबत गोसावी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे निफाड येथील अभियंता सागर बांगरे यांना निवेदन दिले. सिन्नर-निफाड मार्गावरील कानडी मळा, बारागावपिंप्री, निमगाव, केपानगर, हिवरगाव, म्हाळसाकोरे यांसह विविध ठिकाणी वाहनांचा वेग कमी करण्यासाठी गतिरोधक उभारण्यात आले आहेत. अपघातांना आळा घालण्यासाठी मार्गावरील सर्व गतिरोधकांवर तातडीने पांढरे पट्टे मारावेत.
तसेच रात्रीच्या वेळी गतिरोधक स्पष्ट दिसण्यासाठी कॅटआयज ब्लिंकर बसवावेत, अशी मागणी गोसावी यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत तहसीलदार सुरेंद्र देशमुख तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, नाशिक यांनाही देण्यात आली आहे. पांढरे पट्टे मारण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
रात्री गतिरोधकाचा अंदाज न आल्याने होतात अपघात
गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने रात्रीच्या वेळी वेगाने येणार्या वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. अचानक गतिरोधक समोर आल्याने वाहनांचा ताबा सुटून छोटे-मोठे अपघात होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या अपघातांमध्ये अनेक जण जखमी होऊन अपंगत्वाला सामोरे गेले असून, काहींना जीवही गमवावा लागल्याचा दावा करण्यात आला आहे.
Danger of ‘invisible’ speed breakers on the Sinnar-Niphad road!
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…