नाशिक

लव्ह जिहाद कायदा असंवैधानिक

ओवैसी: प्रत्येकाला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य

वडाळागांव :  प्रतिनिधी
लव्ह आणि जिहाद या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तलवार उचलून कुणाला तरी मारणे  याला लोक  जिहाद समजतात. भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाला  त्याच्या इच्छेनुसार  जोडीदार निवडण्याचा  अधिकार देतो. जर कोणी आपल्या पसंतीनुसार जोडीदार निवडून लग्न करीत असेल तर इतरांना त्रास होण्याचे काही कारण नाही. भाजपाशासीत राज्यात जिथे लव्ह जिहादचा कायदा  बनला तो असंवैधानिक आहे, असे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी  माध्यमांशी बोलताना सांगितले.
नाशिकमध्ये खासगी दौर्‍यावर आलेल्या ओवैसी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
देशात भाजपाचे सरकार जेव्हापासून सत्तेत आले आहे, तेव्हापासून अल्पसंख्याक समाजाला अनेक त्रास सहन करावे लागत आहे.  या समाजाला मॉबलिचिंगला सामोरे जावे लागत आहे.
अनधिकृतपणे घरे पाडण्यात येत आहे. उत्तराखंडमध्ये हलवानीत 4 हजार घरात राहणारे गरीब 70 हजार कुटुंबीय थंडीत मागील काही दिवसापासून त्यांच्या घराच्या संरक्षण साठी भांडत आहे.

देशात लव्ह जिहादपेक्षा  बेरोजगारी व महागाईचा मुद्दा महत्वाचा आहे. जगात सर्वात जास्त बेरोजगारी भारतात आहे. पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहे. याकडे लक्ष नाही, कोणी लग्न करत आहे, कोणी प्रेम करत आहे तर त्याला विरोध असण्याचे काही कारण नाही. राज्यात  शेतकर्‍यांचे प्रचंड हाल आहे. यावर कोणीच काही बोलत नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबद्दल केलेले वक्तव्य चुकीचे आहे. असेही ओवैसी म्हणाले. यावेळी एम आय एम चे जावेद मुन्शी, मुख्तार शेख़, रमज़ान पठाण, फरिद शेख, मोसीन शाह, हैदर शेख, अकीब शेख, सलीम शेख, सैफ सैय्यद आदी उपस्थित होते.

वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय आंबेडकरांचा
युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांचा होता.आम्ही त्यांच्या सोबत आहे, मी त्यांचे आज ही आदर करतो, कालही करत राहिल, वंचित समाजाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न होता. पण आंबेडकर यानी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावर मी काय बोलू शकतो..? आमची युती का तुटली, ती मोठी गोष्ट आहे. ती मी आता येथे उभे राहून कसं बोलू..? ही एक मोठा चर्चा आहे.

’ये ओवेसी साहब है’
बुधवारी औरंगाबादहून नाशिककडे निघालेले खा.असदुद्दीन ओवेसी हे कोपरगाव तालुक्यातील एका मशिदमध्ये संध्याकाळी नमाज पठणासाठी आले, मात्र, परिसरातील नागरिकांनी ओवेसीना ओळखलेच नाही. नमाजनंतर अनेकांनी ’आपको कही देखा है’ म्हणत गर्दी केली. काही वेळातच सोबत असलेल्या एका व्यक्तीने ’ ये ओवेसी साहब है’ असे सांगितल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. नंतर लोकांनी त्यांचे स्वागत केले.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

12 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

12 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

12 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

12 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago