– मनीषा चौधरी

प्रेम ही अशी भावना आहे, जी माणसाला आतून समृद्ध करते आणि जगण्याला अर्थ देते. आई-वडिलांचे वात्सल्य, मित्रांची साथ, जोडीदाराचे समर्पण किंवा समाजाबद्दलची आपुलकी, प्रेम प्रत्येक रूपात जीवनाला बळ देते.
प्रेम माणसाला मानसिक आणि भावनिक सुरक्षितता देते. एकदा परीक्षेत नापास झालेला एक मुलगा घरी यायला घाबरत होता. दारातच आईने त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हटले, एकदा अपयश आले म्हणून काय झाले? मी तुझ्यासोबत आहे. त्या एका वाक्याने त्याची भीती निघून गेली. त्याने पुन्हा अभ्यास सुरू केला आणि पुढच्या वेळी चांगले यश मिळवले. प्रेमाचा तो स्पर्श त्याला कोणत्याही बक्षिसापेक्षा मोठी ताकद देऊन गेला. प्रेम नसेल तर माणूस गर्दीतही एकटा पडतो आणि ही एकटेपणाची भावना त्याला आतून पोखरते. म्हणूनच निरोगी मन आणि आनंदी जीवनासाठी प्रेम देणे आणि मिळणे दोन्ही आवश्यक आहे.
प्रेमामुळे सहानुभूती आणि माणुसकी जिवंत राहते. प्रेम आपल्याला इतरांच्या सुखात सुख आणि दुःखात दुःख मानायला शिकवते. जेव्हा आपण मनापासून प्रेम करतो, तेव्हा अहंकार, राग आणि द्वेष गळून पडतात. त्यामुळे समाजात शांतता, बंधुभाव आणि सलोखा वाढतो आणि जिथे आदर व प्रेम असते, तो समाज
प्रगती करतो.
प्रेम आपल्याला क्षमा करायला आणि तडजोड करायला शिकवते. नात्यांमध्ये लहान-मोठे वाद होतातच, पण प्रेमाचा ओलावा असेल तर मोठे वादही सहज मिटतात. प्रेम माणसाला अधिक सहनशील, नम्र आणि समजूतदार बनवते आणि स्वतःपलीकडे जाऊन इतरांचा विचार करायला लावते.
जीवनातून प्रेम वजा केले तर आयुष्य नीरस आणि यांत्रिक प्रवास बनेल. म्हणून आपण स्वतःवर, आपल्या माणसांवर आणि निसर्गावर भरभरून प्रेम केले पाहिजे.
आपण जेवढे प्रेम वाटतो, तेवढाच आनंद आपल्याकडे परत येतो. प्रेम हक्काने मिळवण्याची गोष्ट असली, तरी भांडून किंवा जबरदस्तीने मिळत नाही, ते
निःस्वार्थी भावनेने कमावावे लागते. चला, मनात कोणताही आकस न ठेवता प्रेमाचा हा झरा वाहत ठेवूया, कारण प्रेम हेच जगाला सुंदर बनवण्याचे एकमेव
माध्यम आहे.

Love

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

आखिर कब तक चुप रहेगी?

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥ भावार्थ : जिथे स्त्रीचा…

8 hours ago

’रामायण’ची आधुनिक झेप

- मनीषा चौधरी चित्रपटसृष्टीत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि…

8 hours ago

व्हिटॅमिन बी-12 च्या मदतीने केली नवी रिचार्जेबल बॅटरी

- डॉ. किशोर पवार मानवी शरीरासाठी जीवनसत्त्वाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची कल्पना सर्वांनाच आहे.…

8 hours ago

आत्महत्या हा उपाय नाही…

- ज्योती काळे-जाधव अलीकडच्या काळात घडणार्‍या आत्महत्यांच्या घटना मनाला अस्वस्थ करून जातात. पुण्याची पायल, काल…

8 hours ago

दिवाळी संपली; फराळाच्या आठवणी कायम

- प्रणाली देशमुख तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड…

8 hours ago

दिशादर्शकांवर ‘भाऊ-दादां’ची मक्तेदारी!

- वाहिद बागवान रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस…

8 hours ago