नाशिक : प्रतिनिधी
दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या काळात झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र, यंदा झेंडूला बाजारात अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकर्यांची दिवाळी फिकी पडली आहे. नाशिक परिसरात झेंडू फुलांना सध्या केवळ 20 ते 22 रुपये किलो दर मिळत असून, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकर्यांच्या मेहनतीचा मोबदला शून्य ठरला आहे.
कांद्याला भाव न मिळाल्याने पर्याय म्हणून अनेक शेतकर्यांनी झेंडू शेतीचा प्रयोग केला होता. नाशिक तालुक्यातील शेतकरी कुणाल शिंदे यांनी सुमारे 30 हजार रुपयांचा खर्च करून 15 गुंठे क्षेत्रात पिवळ्या व केशरी झेंडूची लागवड केली. दसर्याच्या काळात झेंडूला 15 ते 20 रुपये किलो दर मिळाला होता; मात्र दिवाळीत हा दर 50 ते 60 रुपये किलोपर्यंत वाढेल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु बाजारात मागणीपेक्षा उत्पादन अधिक झाल्याने दर कोसळले.
क्रेट दर
झेंडू -150-250 रुपये,
झेंडूच्या फुलांच्या माळा
-30 ते 100 रुपये.
सध्या व्यापारी फक्त 20 ते 22 रुपये किलो दर देत आहेत. त्यामुळे खतं, मजुरी, पाणी व वाहतूक खर्चही भागत नाही. मेहनत, खर्च आणि अपेक्षा – सर्व व्यर्थ गेल्याची भावना आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
कांद्याच्या संकटातून सावरण्यासाठी पर्यायी पिकाचा पर्याय म्हणून झेंडू घेतलेल्या शेतकर्यांना दरघसरणीने पुन्हा धक्का बसला आहे. झेंडूचे उत्पादन मुबलक असून, मागणी मात्र स्थिर असल्याने भाव कोसळले आहेत. सणासुदीच्या हंगामातसुद्धा शेतमालाला योग्य दर न मिळाल्याने शेतकर्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे.
दरवर्षी दिवाळीच्या हंगामात फुलांचे भाव चढतात, पण यंदा बाजारात ओसंडून आलेल्या झेंडूमुळे व्यापार्यांनी दर कमी ठेवले. शेतकर्यांनी केलेली गुंतवणूक, मजुरी व मेहनत सर्व पाण्यात गेली, असा सूर नाशिक परिसरातील शेतकर्यांतून
उमटत आहे.
कांदा प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्ध नग्न आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाचा आंदोलकांना पाठिंबा…
शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू सिडको : दिलीपराज सोनार जुने सिडको परिसरातील शॉपिंग…
लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा…
राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत सातपूर : सातपूर…
जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दाखल करण्यास नकार — छावा क्रांतीवीर सेनेकडून रुग्णालय प्रशासनाचा तीव्र निषेध!…
सिडको : विशेष प्रतिनिधी वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून…