नाशिक

नाशिक शहरात मुसळधार पावसातही ‘महावितरण’ कार्यरत

विद्युत यंत्रणेवर झाडे कोसळल्याने खंडित पुरवठा तातडीने सुरळीत

नाशिक :
नाशिक शहरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडे कोसळल्याने महावितरणच्या विद्युत यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः अंबड, सातपूर तसेच शहरातील विविध भागांसह औद्योगिक भागातसुद्धा 33 केव्ही आणि 11 केव्ही वीज वाहिन्यांवर आणि यंत्रणेवर झाडे व फांद्या कोसळल्याने शहरातील काही वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही महावितरणच्या अभियंते व जनमित्रांनी तत्परता दाखवत युद्धपातळीवर काम सुरू करून बहुतांश भागांतील वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. सर्वांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कार्यरत असून, तरी ग्राहकांनी संयम राखून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
शरीन ऑटो, टपारिया या 11 केव्ही वाहिनीवर बॉश कंपनीजवळ, सुयोग रबर या 11 केव्ही वाहिनीवर सिप्रा कंपनीजवळ झाड कोसळले, त्यामुळे या भागातील महावितरणचे रोहित्र व खांब कोसळले तसेच महिंद्रा हरियाली या 11 केव्ही वाहिनीवर शान कार शोरूमजवळदेखील झाड कोसळल्याने विद्युत पुरवठा
बाधित झाला.
अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत 13 ठिकाणी वृक्ष कोसळले, त्यामुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सदर विद्युत पुरवठा मनपा अग्निशमन विभाग तसेच महावितरण कर्मचारी यांच्या मदतीने तातडीने सुरळीत करण्यात आला. सदर वीजपुरवठा सुरू करण्यासाठी अंदाजे दोन ते तीन तास कालावधी लागला.
नाशिक शहरातील अंबड 2 विद्युत उपकेंद्र, नीरज, इंडस्ट्रियल 1 आणि 5, नीलचंद्र, आएसओ ओल्टा या वाहिनीवरील 10 रोहित्रे, कलानगर, गंजमाळ, पंचवटीमधील चव्हाण मळा या विद्युत वाहिनीवरील वीजपुरवठा तसेच कॉलेज स्वामीनारायणनगर, म्हसरूळ आदी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, सदर ठिकाणी झाडे व फांद्या बाजूला करून अनेक भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, तक्रार प्राप्त होताच प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून काम सुरू केले जात आहे. पाणी साचलेल्या भागात जिवंत विजेचा प्रवाह उतरून अपघात होऊ नये, यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करूनच दुरुस्तीची कामे केली जात आहेत. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि क्षेत्रीय कर्मचार्‍यांशी समन्वय ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात आला आहे. नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे आणि अधीक्षक अभियंता अनिल थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता चेतन वाडे यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत अभियंते, जनमित्र, कंत्राटदार व त्यांचे कर्मचारी आणि अत्यंत धाडसाने व सेवाभावाने कार्य
करत आहेत.

‘Mahavitaran’ remains operational in Nashik city despite heavy rainfall.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

18 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

18 hours ago