फडणवीस : उत्तर महाराष्ट्र पदाधिकार्यांची आढावा बैठक
नाशिक : प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणूनच मतदारांना सामोरे जाणार असून, ज्या ठिकाणी युती होणार नाही तेथे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी सांगितले. श्री स्वामिनारायण कन्व्हेन्शन सेंटर, आडगाव नाका, पंचवटी नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, पणन व राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील भाजप पदाधिकारी, आमदार व खासदार उपस्थित होते.
यावेळी फडणवीस यांनी सांगितले की, अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुढे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने विभागाच्या बैठका घेतल्या आहेत.
कोणत्याही पक्षातील गुन्हेगारांना थारा नाही
पोलिस आयुक्तांना पूर्ण मोकळीक ः मुख्यमंत्री
जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर कठोर भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो, महायुती, महाविकास आघाडी किंवा इतर कोणत्याही संघटनेचा, त्याला थारा दिला जाणार नाही.
मी स्वतः नाशिक पोलिस आयुक्तांना पूर्ण मोकळीक दिली आहे. कारवाई करताना कोणाच्याही राजकीय पाठिंब्याकडे पाहू नका, असे स्पष्ट आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. गुन्हेगारीला राजाश्रय देण्याचा प्रयत्न करणार्या प्रवृत्तींचा आम्ही पूर्णपणे बंदोबस्त करू. पक्षातील कोणाचाही भूतकाळ काहीही असो, सध्या जर कोणी गुन्हेगारीकडे वळत असेल, तर त्याला आम्ही सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांनी नाशिक पोलिसांचे कौतुक करत सांगितले की, गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यांना सरकारकडून सर्व प्रकारचे सहकार्य आणि मोकळीक देण्यात आली आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…