व्ही.एन. नाईक संस्थेच्या विशेष सभेत सूचनांचा पाऊस
नाशिक : प्रतिनिधी
क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची संख्या कमी न करता जैसे थे ठेवावी, वारस सभासद शुल्क 21 हजारांऐवजी सर्वांना परवडेल असे ठेवावे, निवडणूक लढविण्यासाठी असलेल्या अटी आणि वयोमर्यादेवर आक्षेप नोंदवत सभासदांनी काल झालेल्या सभेत घटना दुरुस्तीतील तरतुदींना विरोध दशर्र्विला. तब्बल तीन तास चाललेल्या विशेष सभेत सभासदांकडून सूचनांचा पाऊस पडला. अखेर सर्व सभासदांच्या सूचनांचा अभ्यास करुन अंतिम मसुदा पुढील महिन्यात होणार्या सर्वसाधारण सभेत मांडून त्यानंतरच घटना दुरुस्तीचा निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी केली.
क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या घटना दुरुस्तीसाठीची विशेष सभा काल संस्थेच्या आवारात पार पडली. यावेळी व्यासपीठावर सरचिटणीस हेमंत धात्रक, उपाध्यक्ष दिगंबर गिते, अॅड. पी. आर गिते, माजी आमदार बाळासाहेब सानप, पुंजाभाऊ सांगळे, जयंत आव्हाड, तानाजी जायभावे, लक्ष्मण जायभावे यांच्यासह संचालक उपस्थित होते. प्रारंभी नाईक आणि गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी घटना दुरुस्ती मसुद्याचे वाचन केले. प्रास्तविकात धात्रक यांनी संस्थेची घटना दुरुस्ती बर्याच वर्षानंतर होत असल्याचे सांगत बदलत्या काळात घटना दुरुस्तीची गरज अधोेरेखित केली. त्यानंतर सभासदांनी सूचना मांडल्या. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी वारस सभासद फी 21 हजार रुपये ही सर्वांनाच परवडणारी नाही. त्यामुळे ती कमी ठेवावी, महिला संचालकांची संख्या कमी करु नये अशा सूचना केल्या. तर माजी आमदार अशोक धात्रक यांनी संस्थेच्या शैक्षणिक संकुलाला स्व. तुमाराम दिघोळे यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर होऊनही त्याची अमलबजावणी झाली नसल्याची खंत व्यक्त केली. सभासदत्व मिळाल्यानंतर ठराविक वर्षांनंतरच निवडणूक लढविता येण्याची अट काढून टाकावी, सलग दोन टर्म पदे भूषविलेल्या मंडळींना तिसर्यांदा निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, मुलीच्या वारसांनाही सभासदत्व द्यावे, अशी मागणी केली. अॅड. भाऊसाहेब गंभीरे यांनी महागाई वाढली म्हणून सभासद फी वाढविण्याच्या मुद्यावर आक्षेप घेतला. संस्थेने स्वायत्त विद्यापीठ, चांगल्या शिक्षण संस्थांबरोबर करार करावा, फक्त वारसांनाच नव्हे तर सर्वांनाच सभासदत्व द्यावे, स्किल डेव्हलपमेंटवर भर द्यावा, दोष सिद्धी झाल्यानंतरच सभासदत्व रद्द करावे. निवडणुकीत अनामत रक्कम वाढवावी. आदी सूचना केल्या. पंढरीनाथ थोरे यांनीही सभादत्व फी वाढीला विरोध केला. अनेक सभासदांचे वय झाले आहेत. त्यामुळे त्यांनी सूचविलेल्या वारसांना सभासदत्व द्यावे. त्यामुळे तरुणांना संधी मिळेल. अभ्यास करुनच घटना दुरुस्ती मसुदा तयार करावा. आदी सूचना केल्या. याशिवाय बाळासाहेब घुगे, जे.डी.केदार, उल्हास कुटे, विलास आंधळे, बाळासाहेब वाघ, भागीनाथ घुगे, वसंत वाघ, संतोष कथार, चंद्रकांत सांगळे, अॅड. राजेंद्र दराडे, मनोज बुरकुले, प्रभाकर धात्रक, सुरेश घुगे यांच्यासह सभासदांनी सूचना मांडल्या.
Maintain the current number of directors; opposition to membership fees
- वासवदत्ता अग्निहोत्री चित्रपटात, नाटकात, जुन्या कथांमधून आपण हे बर्याच वेळेस ऐकलेय. अधिकारीवर्ग, दवंडी पिटून…
- सुजाता येवले पूर्वीच्या काळातले दिवे लागण्याच्या कातरवेळेला वातावरण आणि मन शुभ पवित्र, ऊर्जाभारित बनवणारे,…
- सीमाताई मराठे राज्यातील आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.…
सहकार्याच्या पडद्यामागे महासत्तांचा संघर्ष! - समाधान कदम जागतिक राजकारणात महासत्तांमधील संघर्षाचे स्वरूप काळानुसार बदलत गेले…
- राजेश शिरभाते राज्यातील विविध प्रकल्पांसाठी व ते सुरळीत कार्यान्वित होण्यासाठीचे अनेक महत्त्वाचे सल्ले काल…
भाच्याने गमावला पाय; मामाच्या हाताची बोटे तुटली इगतपुरी : प्रतिनिधी इगतपुरी रेल्वेस्थानकावर पंचवटी एक्स्प्रेसमधून प्रवास…