सिडको : प्रतिनिधी
सोन्याच्या अंगठ्या पाहण्याच्या बहाण्याने आडगाव येथील आर्या ज्वेलर्स या दुकानात प्रवेश करून अंगठ्यांचा ट्रे घेऊन पसार झालेल्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट दोनने छडा लावला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार आणि तीन मोबाइल असा एकूण पाच लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अन्य चार साथीदारांचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.
8 नोव्हेंबर 2026 रोजी आडगाव परिसरातील आर्या ज्वेलर्स दुकानात ही घटना घडली होती. सोन्याच्या अंगठ्या पाहण्याचा बहाणा करून काही अनोळखी व्यक्तींनी दुकानात प्रवेश केला. दुकानदाराचे लक्ष विचलित करून सोन्याच्या अंगठ्यांचा ट्रे घेऊन त्यांनी पलायन केले होते. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनने समांतर तपास सुरू केला. दुकान परिसरातील सीसीटीव्ही
फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांनी पांढर्या रंगाच्या हुंदाई ऑरा मोटारीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. या मोटारीच्या आधारे तपास केला असता आरोपी उत्तर प्रदेशातील असल्याची
माहिती मिळाली.
त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक प्रयागराज येथे रवाना झाले. सलग पाच दिवस शोधमोहीम राबवून पोलिसांनी अंतिम कामताप्रसाद तिवारी (वय 30, व्यवसाय चालक, रा. गारियाव, ता. मछलीशहर, जि. जौनपूर) आणि राहुल राजेंद्रप्रसाद सिंग (वय 34, व्यवसाय मोटार मेकॅनिक, रा. जमुनीपूर नडाल, ता. मछलीशहर, जि. जौनपूर) यांना अटक केली.
चौकशीत या दोघांनी अन्य चार साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पांढर्या रंगाची हुंदाई ऑरा मोटार आणि तीन मोबाइल असा एकूण पाच लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक केलेल्या दोघांना नाशिक येथे आणून पुढील कारवाईसाठी आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत गोहिते, संजय सानप, बाळू शेळके, यशवंत बेंडकोळी, शंकर काळे, सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, वाल्मीक चव्हाण, मनोज शिंदे आणि प्रवीण वानखेडे
यांनी केली.
Two individuals who made off with a tray of gold rings have been apprehended; both were taken into custody in Prayagraj.
- वासवदत्ता अग्निहोत्री चित्रपटात, नाटकात, जुन्या कथांमधून आपण हे बर्याच वेळेस ऐकलेय. अधिकारीवर्ग, दवंडी पिटून…
- सुजाता येवले पूर्वीच्या काळातले दिवे लागण्याच्या कातरवेळेला वातावरण आणि मन शुभ पवित्र, ऊर्जाभारित बनवणारे,…
- सीमाताई मराठे राज्यातील आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.…
सहकार्याच्या पडद्यामागे महासत्तांचा संघर्ष! - समाधान कदम जागतिक राजकारणात महासत्तांमधील संघर्षाचे स्वरूप काळानुसार बदलत गेले…
- राजेश शिरभाते राज्यातील विविध प्रकल्पांसाठी व ते सुरळीत कार्यान्वित होण्यासाठीचे अनेक महत्त्वाचे सल्ले काल…
भाच्याने गमावला पाय; मामाच्या हाताची बोटे तुटली इगतपुरी : प्रतिनिधी इगतपुरी रेल्वेस्थानकावर पंचवटी एक्स्प्रेसमधून प्रवास…