नाशिक

ध्वजारोहणासाठी नाशिकमध्ये वाहतुकीचा ‘महाबंदोबस्त’

उद्या, परवा रामकुंड, पंचवटी परिसरातील प्रमुख रस्ते बंद

♦  गोदाघाट ‘नो व्हेईकल झोन’
♦  वाहनतळांपासून पुढील प्रवास पायी

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा-2027 ची नांदी ठरणार्‍या धर्मध्वज मिरवणूक, ध्वजारोहण सोहळा आणि गोदाआरतीसाठी पोलिसांनी नाशिकच्या वाहतुकीसाठी महाबंदोबस्त नियोजित केला आहे. धर्मध्वज मिरवणुकीनिमित्त शुक्रवारी (दि.30), तर शनिवारी (दि.31) ध्वजारोहण आणि गोदाआरतीमुळे रामकुंड, गोदाघाट व पंचवटी परिसरातील प्रमुख रस्ते बंद राहणार आहेत. राष्ट्रपती, साधू-महंत, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि भाविकांची उपस्थिती लक्षात घेऊन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी विशेष अधिसूचना जारी केली आहे.
शुक्रवारी सकाळी सहापासून मिरवणूक संपेपर्यंत, तर शनिवारी सकाळी सहा ते मध्यरात्रीपर्यंत निर्बंध लागू राहतील. रामतीर्थ व गोदाघाट परिसर ‘नो व्हेईकल झोन’ राहणार असल्याने भाविकांना निर्धारित वाहनतळांवर वाहने उभी करून पुढील प्रवास पायी करावा लागेल. शुक्रवारी तपोवन मैदानातून निघणारी धर्मध्वज मिरवणूक तपोवन क्रॉसिंग, काट्या मारुती चौक, देवी चौक, गणेशवाडी, गाडगे महाराज पूल, दिल्ली दरवाजा, नेहरू चौक, धुमाळ पॉइंट, मेनरोड, रविवार कारंजा आणि अहिल्यादेवी होळकर पुलामार्गे रामतीर्थ येथे पोहोचेल. मिरवणूक मार्गासह अशोक स्तंभ ते रविवार कारंजा, रेडक्रॉस ते धुमाळ पॉइंट, मालेगाव स्टँड ते मखमलाबाद नाका आणि दिंडोरी नाका ते मालेगाव स्टँड या मार्गांवर वाहतुकीला निर्बंध असतील.
ध्वजारोहण आणि गोदाआरतीसाठी शनिवारी पंचवटी व रामकुंड परिसरातील प्रमुख मार्ग बंद राहतील. गाडगे महाराज पूल आणि रामसेतू पुलावरील वाहतूकही बंद असेल. वाहनचालकांनी दिंडोरी नाका, पेठ नाका, मखमलाबाद नाका, गोदा पार्क, गंगापूर नाका, सीबीएस मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ, जुना गंगापूर नाका, फडोळ चौक, तारवाला सिग्नल, अमृतधाम चौक किंवा पेठ नाका, कृषी उत्पन्न बाजार समिती सिग्नल, तारवाला सिग्नल, अमृतधाम चौक, मिर्ची चौक या पर्यायी मार्गांचा वापर करावा. द्वारकाकडून बळी मंदिराकडे जाणार्‍यांनी उड्डाणपुलाचा वापर करावा, असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.

 

‘Major security and traffic arrangements’ in Nashik for flag-hoisting ceremony

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कुंभथॉन

- योगिनी पैठणकर नाशिक येथे 2027-28 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. आपणा सर्वांना त्याची माहिती…

4 minutes ago

नाशिकच्या रस्त्यांवर मृत्यूचा सापळा!

- अफजल पठाण रस्त्यावर निघताना स्वप्नं असतात घरी परतण्याची, पण भीती असते वाटेतच आयुष्य संपण्याची…

11 minutes ago

जुन्या वाहनांना नवा साज; सिन्नर न.प.ची खर्चात बचत!

‘टाकाऊपासून टिकाऊ’ उपक्रमातून कचरा संकलन गाड्या पुन्हा सेवेत सिन्नर : प्रतिनिधी जुन्या वाहनांची दुरुस्ती आणि…

17 minutes ago

सिन्नर तालुक्यात 5,626 शिधापत्रिकांचा धान्य कोटा बंद

आयकरदाते, सरकारी कर्मचार्‍यांच्या कुटूंबांचा समावेश; रेशनकार्ड मात्र सुरूच, आरोग्य योजनांचा लाभही मिळणार सिन्नर : प्रतिनिधी…

21 minutes ago

सिद्धपिंप्रीत शॉर्टसर्किटमुळे डाळिंबबागेस आग

तातडीने भरपाई देण्याची शेतकर्‍यांची मागणी निफाड : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील सिद्धपिंप्री येथील शेतकरी शिवाजी नथू…

34 minutes ago

दुष्काळस्थितीत पेठमध्ये वनराई बंधार्‍यांचा आधार

73 ग्रामपंचायतींत 163 बंधारे; सहा कोटी सात लाख लिटर जलसाठा ♦ पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची…

54 minutes ago