जुने साहित्य जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली
सिडको : प्रतिनिधी
इंदिरानगर-साईनाथनगर परिसरातील साई अक्षदा मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या एका रो-बंगल्याला बुधवारी (दि. 28) सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीच्या धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बंगल्यात ठेवलेल्या जुन्या बॅटर्या आणि मंडपाच्या साहित्याने अचानक पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते.
या घटनेची माहिती मिळताच सिडको आणि शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीत बंगल्यातील साहित्य जळून खाक झाले. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इंदिरानगर पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून घटनेचा तपास सुरू आहे.
Major fire at a row bungalow in Indiranagar
- अफजल पठाण रस्त्यावर निघताना स्वप्नं असतात घरी परतण्याची, पण भीती असते वाटेतच आयुष्य संपण्याची…
‘टाकाऊपासून टिकाऊ’ उपक्रमातून कचरा संकलन गाड्या पुन्हा सेवेत सिन्नर : प्रतिनिधी जुन्या वाहनांची दुरुस्ती आणि…
आयकरदाते, सरकारी कर्मचार्यांच्या कुटूंबांचा समावेश; रेशनकार्ड मात्र सुरूच, आरोग्य योजनांचा लाभही मिळणार सिन्नर : प्रतिनिधी…
तातडीने भरपाई देण्याची शेतकर्यांची मागणी निफाड : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील सिद्धपिंप्री येथील शेतकरी शिवाजी नथू…
73 ग्रामपंचायतींत 163 बंधारे; सहा कोटी सात लाख लिटर जलसाठा ♦ पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची…