नाशिक

पाट्या मराठीत करा, अन्यथा खळ्ळ खट्याक

क्लासचालकांना मनविसेचा इशारा

नाशिक : प्रतिनिधी
क्लासेसच्या पाट्या मराठीत करा, अन्यथा खळ्ळ खट्याक करण्यात येईल, असा इशारा मनविसेच्या वतीने क्लासचालकांना दिला आहे. मनसेच्या वतीने सोमवार, दि.2 रोजी क्लासचालकांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे, मनविसेच्या वतीने नाशिक शहरातील एका नामांकित क्लासमध्ये एका विद्यार्थ्याला फी न भरल्यामुळे क्लासमध्ये बसून दिले नव्हते. त्याचे आयकार्डही क्लासने जमा केले होते. त्यानंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी मनसेकडे धाव घेतली. मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने क्लासला यासंदर्भात जाब विचारण्यात
आला.
मात्र, यावेळी असे निदर्शनास आले की, नाशिक शहरातील अनेक नामवंत क्लास आहेत ते भरमसाठ फी घेऊन आपल्या क्लासची जाहिरात करत असतात. सर्व क्लासेसच्या पाट्या आणि जाहिराती या इंग्रजीमध्ये असून, महाराष्ट्रात राहून मराठीची अवहेलना होत आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारने दखल घेऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे. ज्याप्रमाणे भारतात दक्षिण राज्यांमध्ये त्यांच्या स्थानिक भाषेला प्राधान्य देण्यात येते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पण मराठीची अवहेलना नको, यासाठी मनसे अग्रेसर असून, लवकरात लवकर सर्व क्लासचालकांनी याची दखल घेऊन आपल्या सगळ्या इंग्रजी पाट्या आणि जाहिराती मराठीमध्ये कराव्यात, अन्यथा मनसेतर्फे खळ्ळ खट्याक करण्यात येईल.
तसेच सर्व विषयांचे शिक्षक हे मराठी भाषिक असावे. अनेक क्लासेसमध्ये असे दिसून आले आहे की, अनेक शिक्षक हे परप्रांतीय असून, त्यांची भाषा विद्यार्थ्यांना समजत नाही, परंतु क्लासच्या नावामुळे तिथे
अ‍ॅडमिशन घ्यावे लागते. क्लासची फी पण भरमसाठ राहते. याची नोंद घेऊन प्रत्येक क्लासमध्ये मराठी भाषिक शिक्षक पाहिजे. क्लासच्या परिसराला पार्किंग आहे की नाही, क्लासमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहे का, क्लासमध्ये फायर सेफ्टीसाठी तरतूद केली आहे का हे सर्व क्लासचालकांनी तपासावे आणि तसे नसेल तर लवकरात लवकर त्यात सुधारणा करावी, अन्यथा मनसे आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष ललित वाघ, जिल्हाध्यक्ष कौशल पाटील, मनसे शहर संघटक रोहित उगावकर, उपजिल्हाध्यक्ष नितीन धानापुणे, शाखाध्यक्ष वर्धमान संचेती, मनविसे विभाग अध्यक्ष अक्षय गवळी, मयूर जैन, मोहित पाटील, मयूर पाटील, तेजस पाटील, शुभम रोकडे, प्रतीक तुपसमुद्रे आदींच्या
सह्या आहेत.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago