नाशिकरोड : वार्ताहर
विहितगाव परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पानटपरीत कोयता लपवून ठेवणार्या युवकाला उपनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विहितगाव पुलाजवळ देवळालीगाव परिसरात ओमकर पानटपरी नावाने दीपक पगारे (वय 40) या युवकाची टपरी आहे. त्याने आपल्या टपरीमध्ये कोयता लपवून ठेवला होता. परिसरात दहशत माजवण्यासाठी त्याने हा कोयता बाळगल्याची माहिती उपनगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.
यावेळी कोयता आढळून आला असून, दीपक पगारे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, हवालदार विनोद लखन, पोलीस शिपाई पंकज कर्पे, सौरभ लोंढे, संदेश रगतवान, सूरज गवळी आणि सुनील गायकवाड यांनी
कारवाई केली.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…