नाशिक

मालेगाव बांगलादेशी घुसखोरांचा अड्डा; सोमय्या यांचा आरोप

महापालिका प्रवेशद्वारावर महापौर, उपमहापौरांसह महिलांचे आंदोलन

बनावट जन्मदाखल्यांबाबत नवे विधेयक

‘बोगस बांगलादेशी व बनावट जन्मदाखल्यांच्या रॅकेटला आळा
घालण्यासाठी केंद्र सरकार पुढील संसद अधिवेशनात विशेष विधेयक सादर करणार आहे,’ अशी माहिती सोमय्या यांनी दिली. तसेच ज्यांचे दाखले रद्द झाले असून, भारतात जन्माचा ठोस पुरावा आहे, त्यांनीच नव्याने अर्ज करावा, असे आवाहनही त्यांनी केले. सोमय्यांच्या मालेगाव दौर्‍यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे आगामी काळात हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

मालेगाव : प्रतिनिधी
भाजपचे नेते किरीट सोमय्या मंगळवारी मालेगाव दौर्‍यावर आले होते. मालेगाव हे आता बांगलादेशी घुसखोरांचा अड्डा आणि अतिरेक्यांचे केंद्र बनले आहे, असा खळबळजनक आरोप करत सोमय्या यांनी स्थानिक प्रशासकीय यंत्रणेच्या कारवाईचा पाढाच वाचला. या दौर्‍यात सोमय्यांच्या सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना केलेल्या धक्काबुक्कीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या मालेगावची बदनामी करत असल्याचा आरोप करत मंगळवारी मालेगाव महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ महिलांनी आक्रमक आंदोलन केले. महापौर नसरीनबानो खालिद शेख आणि उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. हातात तिरंगा व पक्षीय झेंडे घेऊन आंदोलक महिलांनी सोमय्यांविरोधात घोषणाबाजी केली. “सोमय्या यांना महापालिकेत प्रवेश करू देणार नाही,” अशी ठाम भूमिका महिलांनी जाहीर केली. वर्षभरापूर्वी उघडकीस आलेल्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यानंतर ते अनेकदा मालेगावात आले असून महसूल, पोलीस व महापालिका अधिकार्‍यांच्या बैठका त्यांनी घेतल्या होत्या. त्यांच्या तक्रारीनंतर शहरातील सुमारे साडेचार हजार जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. बोगस दाखले मिळविणार्‍यांमध्ये बांगलादेशी व रोहिंगे घुसखोर असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. दरम्यान, स्थानिक मुस्लिम समुदायाकडून या भूमिकेला तीव्र विरोध होत आहे. जन्म प्रमाणपत्रे रद्द होणे ही प्रशासकीय चूक असून अनेक प्रकरणांत केवळ कागदपत्रांतील त्रुटी कारणीभूत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्यांच्या अधिकृत दौर्‍यात महापालिका भेटीचे नियोजन नसले तरी, ते अचानक महापालिकेत येऊ शकतात या शक्यतेने दुपारी 12 वाजेपासून महिलांनी प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महापालिका परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनादरम्यान महापौर व उपमहापौर यांनी सोमय्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. कोणतेही घटनात्मक पद नसताना आयुक्त व अधिकार्‍यांना बैठकीसाठी बोलावण्याचा अधिकार सोमय्यांना नाही. माहिती हवी असल्यास त्यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये ती मागवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापौर नसरीन बानो यांनी दोन दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांना लेखी पत्र देऊन महासभेची परवानगी घेतल्याशिवाय सोमय्यांना कोणतीही माहिती देऊ नये, असे निर्देश दिले होते. याच भूमिकेच्या समर्थनार्थ महिलांनी आंदोलन केल्याचे सांगण्यात आले. महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात बाहेरील हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.दरम्यान, सोमय्या शहरात दाखल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारण्यासाठी गर्दी केली असता त्यांच्या सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना ढकलल्याचा आरोप झाला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि पत्रकारांनी संताप व्यक्त केला.घुसखोरांच्या मुद्द्यावर बोलताना सोमय्यांनी आकडेवारी सादर केली. आतापर्यंत बोगस जन्म दाखल्यांप्रकरणी 42 एफआयआर दाखल झाले असून 1083 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सुमारे 4400 अवैध दाखले रद्द केले असून आणखी 2000 प्रकरणांची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. घुसखोरांना मदत करणार्‍या 40 हून अधिक अधिकार्‍यांवर कारवाई झाल्याचाही दावा त्यांनी केला.

Malegaon is a haven for Bangladeshi infiltrators; Somaiya alleges

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

खिशात नाही आणा…

खिशात नसताना पैशांचा गजर कशाला, दिखाव्याच्या दुनियेत खोटा हा साज कशाला आई-वडिलांच्या कष्टांवर उभारलेला हा…

6 hours ago

गुन्हेगारीच्या छायेत हरवणारा समाज…

खरंतर समाजात वावरताना वारंवार जाणवणार्‍या या वास्तवामुळेच हा विषय मांडावासा वाटला. कारण तो मांडणं ही…

6 hours ago

स्वमग्नता

अगं आई तो बघ! मावशींचा मुलगा कसे करतो आहे. तो जरा वेडा आहे का? हात…

7 hours ago

शेतीमातीची माणसं…

शेतीची माणसं म्हणजे काळ्या आईची लेकरं.. या काळ्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली असते. या…

7 hours ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात ऑनलाइन रोलेटचा सुळसुळाट

सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…

7 hours ago

वावी परिसराचा दुष्काळ हटणार

कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…

7 hours ago