नाशिक

आज ठरणार मालेगावचा महापौर, उपमहापौर

सेक्युलर फ्रंटकडे काठावरचे बहुमत; शिवसेना थेट महापौरपदाच्या रिंगणात

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक शनिवारी (दि. 7) महापालिकेतील निहाल अहमद सभागृहात होणार असून, तब्बल आठ वर्षांनंतर होणार्‍या या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महापालिकेतील सत्तासहभागाची पारंपरिक गणिते बिघडल्याने शिवसेना थेट महापौरपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून, मालेगाव सेक्युलर फ्रंटकडे असलेले काठावरचे बहुमत आणि शिवसेनेकडे असलेली राज्य सरकारमधील सत्तेची ताकद असा सामना रंगणार आहे. 84 सदस्यांचे सभागृह असले तरी प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहणार्‍या सदस्यांच्या संख्येवरच बहुमताची आकडेवारी ठरणार असून, बहुमतासाठी 43 सदस्यांची आवश्यकता आहे. काही सदस्य अनुपस्थित राहिल्यास सभागृहातील एकूण संख्या कमी होऊन बहुमताचे गणित बदलू शकते. त्यामुळे तटस्थ तसेच अनुपस्थित राहू शकणार्‍या सदस्यांबाबत दोन्ही प्रतिस्पर्धी गटांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
महापालिका निवडणुकीत 11 प्रभागांतून 84 नगरसेवक निवडून आले असून, मालेगाव सेक्युलर फ्रंटकडे बहुमताइतके संख्याबळ आहे. यामुळे पै. शेख रशीद परिवार व शिवसेनेतील पारंपरिक सत्ता सहभागाची मैत्री संपुष्टात आली आहे. एमआयएमने महापौरपदासाठी उमेदवार दिलेला नसला तरी उपमहापौरपदासाठी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचे सुपुत्र हाफिज अब्दुल्ला यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारीमागे विविध राजकीय अर्थ काढले जात असून, गेल्या काही दिवसांत पडद्यामागे झालेल्या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींमुळे चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, इस्लाम पार्टी व समाजवादी पार्टीने आपल्या नगरसेवकांना व्यक्तिगत तसेच जाहीररीत्या व्हीप बजावला असून, कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी खबरदारी घेतली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, सभागृहात प्रवेशापूर्वी तपासणी करून मोबाइल फोन जमा केले जाणार आहेत. तसेच शहरातील काही भागांत तात्पुरती वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, काकाणीनगर वाचनालय, नया जान मौक, महादेव घाट रस्ता आदी ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. अपर पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस अधीक्षक, सुमारे 60 पोलीस कर्मचारी व राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात राहणार आहे.

Malegaon Mayor and Deputy Mayor to be elected today

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

10 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

10 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

10 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

10 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

10 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

10 hours ago