नाशिक

टार्गेट करिअर अकॅडमीत घुसून संचालकास मारहाण

5 हजारांची रोकड लांबवली

सिडको : विशेष प्रतिनिधी
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टार्गेट करिअर अकॅडमीमध्ये घुसून चार जणांच्या टोळक्याने संचालकास मारहाण करत शिवीगाळ केली असून, ऑफिसच्या ड्रॉवरमधील 5 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध
सुरू आहे.
या घटनेतील फिर्यादी अनिल कचरू गायखे (वय 49, रा. गायखे कॉलनी, दत्त मंदिर स्टॉप, नाशिक रोड) हे टार्गेट करिअर अकॅडमीचे संचालक असून, त्यांचे धोंगडे पॉइंट, जगताप मळा येथे ऑफिस आहे. दि. 28 मे 2025 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपी संदीप नलगे, त्याचा भाऊ, अथर्व गवंदर व विनय सकला यांच्यासह चौघे व्यक्ती ऑफिसमध्ये जबरदस्तीने घुसले. अकॅडमीच्या भाडेकरारावरून वाद निर्माण करून फिर्यादी यांच्याकडे जास्तीची रक्कम
मागितली.
फिर्यादी अनिल गायखे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये विनोद सकला याने हातातील ‘फायटर’ या वस्तूने अनिल गायखे यांच्या डोक्यावर घाव घालून त्यांना जखमी केले. यानंतर आरोपी संदीप नलगे याने ऑफिसच्या टेबलमधील ड्रॉवरमधून 5,000 रुपये रोख रक्कम उचलून नेली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वायकर व पोउपनि सोनवणे
करीत आहेत.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago