मनमाडला तरुणाने भिशीच्या नावाखाली लावला कोट्यवधीला चुना..?

मनमाडला तरुणाने भिशीच्या नावाखाली लावला कोट्यवधीला चुना..?

पैसे वसुलीसाठी तरुणाच्या आईला आणि भावाला बांधून केली मारहाण

मनमाड :  प्रतिनिधी

लालच बुरी बोला है ही म्हण मनमाडच्या उच्चभ्रू व्हाईट कॉलर नागरिकांसाठी अत्यंत तंतोतंत लागू होताना दिसत आहे मनमाड शहरातील एका तरुणांनी शहरातील उच्चभ्रू व्हाईट कॉलर नागरिकांना लिलाव भिशी तसेच व्याजा पोटी जास्त रकमेचे आमिष दाखवून करोडो रुपयाचा अपहार करून पोबारा केल्याची घटना घडली असून आपले पैसे मिळावे यासाठी शहरातील एका केटरर्स चालकाने संबंधित तरुणाच्या आई आणि भावाला उचलून आणले व ज्यांनी ज्यांनी पैसे घेतले त्या सर्वांनी मिळून त्यांना बेदम मारहाण करून पैसे वसूल करण्यासाठी आग्रह केल्याची घटना मनमाड शहरात घडली असून हे सर्व आर्थिक काम अनधिकृत म्हणजे इल्लीगल असल्याने याबाबत कोणत्याही प्रकारची पोलीस तक्रार करण्यात आली नसली तरी या घटनेत शहरातील अनेक मोठमोठे व्यापारी राजकीय नेते यांचे करोड रुपये अटकले ची चर्चा शहरातील चहाचे दुकान व पान टपऱ्यांवर रंगू लागली आहे याबाबत पैसे दिलेल्या अनधिकृत सावकार तसेच ठेकेदार व नेते यांनी तेरी भी चूप और मेरी भी चूप अशी भूमिका घेतली आहे मात्र या चर्चेने शहरात एकच खळबळ उडाली असून लालच करून आपले लाखो रुपये बुडाल्याची दुःख मात्र या व्यापारी व राजकीय नेत्यांना सतवत आहे
मनमाड शहरात जास्त व्याजाच्या लालचे पोटी अनेक अनधिकृत सावकार तयार झाले असून गोरगरीब जनतेकडून मोठ्या प्रमाणावर व्याजापोटी लाखो रुपये लुटणाऱ्यांना या सावकारांनाच कोणीतरी लुटलेची घटना मनमाड शहरात घडली असून शहरातील एका तरुणाने लिलावभिशी तसेच जास्तीचे व्याज मिळावे यासाठी पैसे गुंतवून द्या असे सांगून शहरातील उच्चभ्रू व वाईट कॉलर म्हणून मिरवणाऱ्यांनाच आर्थिक तोला दिला असून जवळपास चार ते पाच कोटी रुपये जमा करून या तरुणाने शहरातून पोबारा केला आहे मात्र आपली बुडालेले पैसे वसूल करण्यासाठी शहरातील एका केटरर्स मालकाने ज्या लोकांची आर्थिक फसवणूक झाली यांच्या साह्याने फसवणूक करणाऱ्या तरुणांच्या आईला व भावाला उचलून आणले व त्यांना बांधून बेदम मारहाण करण्यात आली मात्र याबाबत कोणीही पोलीस स्थानकात तक्रार देण्यास गेली नाही या घटनेची शहरात पान टपरी व चहाच्या दुकानावर खुलेआम चर्चा होताना दिसत आहे शहरातील अनेक व्यापारी बेकायदेशीर रित्या सावकारी व्यवसाय चालवतात यामुळे यापैकी कोणीही फसवणूक झाली असली तरी पोलीस सांगतात गुन्हा नोंदवण्यात गेले नाही मुळात शहरातील या सर्व सवकारांची चौकशी व्हावी व गोरगरीब जनतेला फसवणाऱ्यांना कठोर शासन करावे अशी देखील मागणी करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *