नाशिक

ट्रॅफिक सिग्नलसाठी एकात्मिक प्रणालीची गरज

पोलीस आयुक्तांचा पालिकेला प्रस्ताव

नाशिक : प्रतिनिधी
वारंवार होणार्‍या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी शहरातील सर्व ट्रॅफिक सिग्नलचे संचालन एकाच सेंट्रल कमांड अ‍ॅण्ड कंट्रोलद्वारे म्हणजेच एकात्मिक प्रणालीद्वारे जोडण्यात यावा, असा प्रस्ताव नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना पाठवला आहे. एकात्मिक प्रणालीचा वापर झाल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न बर्‍यापैकी मार्गी लावला जाऊ शकतो.
पोलीस प्रशासनाने पालिकेला पाठवलेल्या पत्रात म्हटले की, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात भाविकांची व वाहनांची अफाट गर्दी होणार आहे. हे लक्षात घेता स्मार्ट सिटी व महापालिकेच्या सिग्नल यंत्रणेचे एकत्रीकरण करून वाहतूक पोलिसांना त्याचे थेट नियंत्रण अर्थात ऑपरेशनल अ‍ॅक्सेस देण्यात यावे, अशी मागणी वजा सूचना पोलीस आयुक्तांनी केली आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे नाशिकमधील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान, सुरळीत आणि शिस्तबद्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. एकात्मिक प्रणालीत नाशिक शहर वाहतूक पोलिसांना अधिकृत ऑपरेशनल अ‍ॅक्सेस उपलब्ध करून दिल्यास शहरातील वाहतूक नियमन अधिक गतिमान, समन्वयित, तंत्रज्ञानाधारित व परिणामकारक होण्यास मदत होईल, असा दावा पोलिसांनी व्यक्त केला आहे. शहरात नाशिक स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन अंतर्गत सुमारे 40 तर नाशिक महापालिकेच्या माध्यमातून 20 असे एकूण 60 ट्रॅफिक सिग्नल कार्यरत आहेत. मात्र, या दोन्ही यंत्रणांचे सेंट्रल अ‍ॅक्सेस यंत्रणा स्वतंत्र असल्याने प्रत्यक्ष वाहतूक नियमन करताना पोलिसांना मोठ्या अडचणी येत आहेत. सिग्नलचा ग्रीन टाइम तातडीने बदलणे, व्हीआयपी बंदोबस्त, मोर्चा किंवा आपत्कालीन परिस्थितीत एकाच मार्गावरील सर्व सिग्नलमध्ये समन्वय साधणे कठीण होत असल्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
वाहतूक नियमन करताना येणार्‍या अडचणी
♦ एका मार्गावरील अनेक सिग्नलचे समन्वयित संचालक करण्यात मर्यादा येतात ♦ वाहतूक कोंडीचे लाईव्ह मॉनिटरिंग व त्यानुसार निर्णय घेण्यास अडथळे निर्माण होतात ♦ आपत्कालीन वाहनांना जलद मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी सिग्नल नियंत्रण करणे कठिण होते ♦ शहरातील सर्व सिग्नल यंत्रणा एकाच यंत्रणेतून नियंत्रित करता येत नाहीत वाहतूक कोंडीवेळी आवश्यकतेनुसार सिग्नलचा कालावधी बदलणे अडचणी ठरते♦ आपत्कालीन स्थिती, अपघात, रस्ता बंद, मोर्चे, मिरवणुका वेळी सिग्नलचे संचालन करणे कठिण

 

Manoj Jarange finally calls off his hunger strike.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

7 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

7 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

8 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

8 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

8 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

8 hours ago