नाशिक

द्वारका-नाशिकरोड रस्त्यावर दिल्लीत मंथन

आठ पदरी रस्त्याचे काम, आज पुन्हा बैठक; वाहतूक कोंडीतून होणार सुटका

नाशिक : प्रतिनिधी
वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट ठरलेल्या द्वारका ते नाशिक रोड दरम्यानच्या परिस्थितीवर कायमस्वरूपी महापालिका प्रशासनाकडून तोडगा काढला जाणार आहे. सिंहस्थापूर्वी द्वारका येथे अंडरपासचे काम करण्याबरोबरच द्वारका ते नाशिकरोड या आठ किलोमीटरदरम्यान आठ पदरी रस्त्याचे काम केले जाणार आहे. यासंदर्भात दिल्लीत सोमवारी (दि.9) नाशिक महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांची राष्ट्रीय महामार्ग विभागासमवेत बैठक झाली. मनपा अधिकार्‍यांनी यावेळी सादर केलेल्या अहवालात काही तांत्रिक दुरुस्तीच्या सूचना केल्या असता, त्यावर आज, मंगळवारी (दि.10) पुन्हा बैठक घेतली जाणार आहे.
दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सोमवारी (दि.9) ही बैठक पार पडली. मनपाचे वाहतूक शाखेचे कार्यकारी अभियंता रवींद्र बागूल, नवनीत भामरे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रमुख गुप्ता, रोहित राजपूत उपस्थित होते. या रस्त्याचे काम महापालिका प्रशासन करणार असून त्याकरिता ’न्हाई’कडून निधी मिळणार आहे. द्वारकापासून ते नाशिकरोड दरम्यान वाहनधारकांना दररोज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. भविष्यात वाहतूक कोंडीचे चित्र आणखी विदारक होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन् दोन वर्षांनी होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी सदर मार्गाचे काम केले जाणार आहे.
द्वारका अंडरपासच्या कामाशी समन्वय साधून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे. मंगळवारची बैठक होताच महिनाभरात या रस्तेकामाचा आराखडा अंतिम करण्यात येणार येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून द्वारका ते नाशिकरोड दरम्यान रस्त्यावर प्रचंड वाहने वाढली आहेत. यामुळे विशेषतः नाशिकरोड येथील दत्तमंदिर परिसर व द्वारका भागात सतत वाहतूक कोंडी होते. या मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने चाकरमानी पर्यायी मार्गाचा अवलंब करताना दिसत आहेत.

पक्क्या अतिक्रमणांवर हातोडा

नाशिकरोड ते द्वारका यादरम्यान रस्ताकामाला अडथळा ठरणार्‍या पक्क्या अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, महापालिकेची परवानगी न घेता मनमानीप्रमाणे बांधकाम करणार्‍यांना नोटिसा धाडल्याचे समजते आहे. यानुसार प्रशासन पक्क्या बांधकामांवर हातोडा चालवणार असल्याचे बोलले जात आहे.

महापालिका आयुक्तांची तत्परता

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड ते द्वारका या दरम्यानच्या रस्त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी, याकरिता मनपा आयुक्त मनीषा खत्री विशेष प्रयत्न करताना दिसल्या. विशेषत: सिंहस्थापूर्वी प्रस्तावित काम मार्गी लावण्यासाठी यंत्रणांना कामाला लावल्याचे दिसते.

♦ मुख्य वाहतुकीच्या दोन्ही बाजूंनी येताना-जाताना प्रत्येकी तीन-तीन पदरी असा सहापदरी रस्ता मार्गी लावण्याचे नियोजन.
♦ नाशिकरोड-द्वारकाकडे येताना-जाताना सर्व्हिस रोड.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 days ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 days ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago