15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी; 10 मिनिटे पेपर वाचनास दिला जाणार वेळ
नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी ते बुधवार, दि. 18 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, यंदा सकाळी 11 वाजता पेपर सुरू झाल्यानंतर 10 मिनिटे पेपर वाचन करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. परीक्षेच्या शेवटी हा वेळ जोडला जाणार आहे. हा यंदाच्या परीक्षेतील मोठा बदल असेल.
या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये 8,20,229 मुले, 7,12,240 मुली व 18 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील 10,664 कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, परीक्षेसाठी 3,387 मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. शाखानिहाय नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे : विज्ञान शाखेत 7,99,773, कला शाखेत 3,80,692, वाणिज्य शाखेत 3,20,152, व्यावसायिक (किमान कौशल्याधारित) अभ्यासक्रमात 27,378, तर टेक्निकल सायन्स (आयटीआय) अभ्यासक्रमात 4,492 विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. प्रचलित पद्धतीनुसार ‘माहिती तंत्रज्ञान’ व ‘सामान्य ज्ञान’ या दोन विषयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. माहिती तंत्रज्ञान विषयासाठी 2,36,320 विद्यार्थ्यांनी, तर सामान्य ज्ञान विषयासाठी 1,708 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. बारावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष असते. आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने तातडीची पत्रकार परिषद घेतली. बोर्डाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी यात परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती दिली. नंदकुमार बेडसे यांनी म्हटले की, कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून आम्ही 3 फेब्रुवारीपर्यंत परीक्षेसाठी अर्ज स्वीकारले. यंदा आपण प्रत्येक जिल्ह्यासाठी दोन समुपदेशक नेमले आहेत. ते विद्यार्थ्यांना समुपदेशन करणार आहेत.
बोर्ड स्तरावरही 10 समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्वजण विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करणार आहेत. काही पेपर सकाळी 11 वाजता आणि काही पेपर दुपारी 3 वाजता असणार आहेत. विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागणार आहे.
राज्यात आजपासून बारावीची परीक्षा
(किमान कौशल्याधारित) अभ्यासक्रमात 27,378, तर टेक्निकल सायन्स (आयटीआय) अभ्यासक्रमात 4,492 विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. प्रचलित पद्धतीनुसार ‘माहिती तंत्रज्ञान’ व ‘सामान्य ज्ञान’ या दोन विषयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. माहिती तंत्रज्ञान विषयासाठी 2,36,320 विद्यार्थ्यांनी, तर सामान्य ज्ञान विषयासाठी 1,708 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
परीक्षेत केला मोठा बदल
उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. बारावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष असते. आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने तातडीची पत्रकार परिषद घेतली. बोर्डाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी यात परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती दिली. नंदकुमार बेडसे यांनी म्हटले की, कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून आम्ही 3 फेब्रुवारीपर्यंत परीक्षेसाठी अर्ज स्वीकारले. यंदा आपण प्रत्येक जिल्ह्यासाठी दोन समुपदेशक नेमले आहेत. ते विद्यार्थ्यांना समुपदेशन करणार आहेत. बोर्ड स्तरावरही 10 समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्वजण विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करणार आहेत. काही पेपर सकाळी 11 वाजता आणि काही पेपर दुपारी 3 वाजता असणार आहेत. विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागणार आहे.
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…