पंचवटीतील लुटेरी दुल्हन विरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक: प्रतिनिधी
सद्या लग्न जमणे अवघड होऊन बसले असतानाच लग्नानंतरही वधू कशी निघेल, हे सांगणे तर महाकठीण झाले आहे, लग्नानंतर एका वधूने घरातील दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना पंचवटी येथे उघडकीस आली आहे, तब्बल साडे अकरा लाखाला गंडा घातल्याची घटना घडली आहे,
पंचवटीतील या लुटेरी वधू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल आहे,
याप्रकरणी प्रफुल्ल शांताराम भिडे (45) हे लग्नासाठी वधूच्या शोधात होते. त्यांची भेट संशयित आकाश पावरा रा, शहादा ,दीपक पटेल, राहुल पटेल,पूजा पटेल सर्व रा.नंदुरबार यांच्याशी झाली. संशयित आरोपींनी भिडे यांना नंदुरबार येथे बोलावले, त्यांचे लग्न पूजा पटेल हिजबरोबर लावून दिले, या बदल्यात आरोपींना भिडे यांनी 1 लाख30 हजार दिले, लग्नानंतर पूजा ही भिडे यांच्या पंचवटीतील हिरावाडीत रहायला आली, पण 8 ते 10 मार्च या कालावधीत पूजाने 50 हजार दिले, त्यानंतर पुन्हा 1 लाख ,परत50 हजार संशयित आरोपींना दिले, यादरम्यान पूजा माहेरी गेली, जाताना घरातील सर्व दागिने, मोबाईल 2 फोन घेऊन गेली, आपली पत्नी माहेरी गेली आहे या भरवश्यावर असलेल्य भिडे यांनी घरात शोध घेतला असता सर्व दागिने गायब असल्याचे समजले, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पंचवटी पोलिसात फिर्याद दिली आहे, पोलिसांनी सर्व संशियत आरोपविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…