३१ मार्च २४ नंतरही कांदा निर्यातबंदी राहणार कायम

३१ मार्च २४ नंतरही कांदा निर्यातबंदी राहणार कायम

लासलगाव:-समीर पठाण

लोकसभेच्या निवडणुकीत कांद्याचे भाव वाढून फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने ३१ मार्च २४ नंतरही कांदा निर्यातबंदी कायम ठेवली आहे.

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचे संतोष कुमार सारंगी यांनी  दिनांक २२ मार्च रोजी एक ‘नोटीफिकेशन’ काढून ३१ मार्च २४ नंतरही कांदा निर्यातबंदी पुढील सूचनेपर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे येत्या ८ दिवसांनी तरी निर्यातबंदी हटेल आणि आपल्या उन्हाळी कांद्याला चांगला बाजार भाव मिळेल या प्रतिक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.

वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या परकीय व्यापार विभागाचे महासंचालक यांचे अतिरिक्त सचिव संतोष कुमार सरंगी यांनी कांदा निर्यातबंदी कायम राहणार असे नोटीफिकेशन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे ७ डिसेंबर २३ रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागूू केली होती.ती ३१ मार्च २४ पर्यंत राहणार होती.मात्र नव्या निर्यात धोरणानुसार पुढील सूचना येईपर्यंत ही कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतरही वाढविण्यात आली असल्याचे त्यात म्हटले आहे. HS कोड 07031019 अंतर्गत 31 मार्च 2024 पर्यंत वैध असलेल्या कांद्याच्या निर्यातीवरील निर्यात प्रतिबंध पुढील आदेशापर्यंत वाढवण्यात आला असेही यात म्हटले आहे.

निर्यातीसंदर्भातील सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे परकीय बाजारपेठ गमावण्याची वेळ आली आहे.निर्यात बंदी कांदा नुकसानीत विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.ऑगस्टमध्ये सुरूवातीला ४० टक्के निर्यातशुल्क लागू केल्यानंतर कांद्याचे भाव पडले होते.त्या विरोधात व्यापाऱ्यांनी संप पुकारल्याने बाजारसमित्या बंदला फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला.केंद्राच्या निर्णयामुळे शेतकरी व व्यापारी दोघांचेही नुकसान झाले. त्यानंतर ७ डिसेंबर रोजी केंद्राने निर्यातबंदीच जाहीर केल्याने बाजारभाव वाढीच्या उरल्यासुरल्या अपेक्षाही धुळीस मिळाल्याने शेतकरी हैराण झाले.सध्या कांद्याला कमीत कमी सरासरी १३०० रुपये दर मिळत आहे. त्यातून शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago