14 तरुणांचा मृ्त्यू
लखनौ : प्रतिनिधी
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील अलिगंज येथे असलेल्या एका तीन मजली व्यावसायिक इमारतीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या इमारतीमध्ये एक नामांकित कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि अभ्यासिका तसेच कोचिंग सेंटर चालवले जात होते. या इमारतीतील कोचिंग सेंटरला आग लागल्याने त्यात 14 तरुणांचा मृ्त्यू झाला आहे. विशेष म्हणजे या भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचे वय 20 ते 24 वर्षांचे आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात शोक लहर उमटली आहे. या इमारतीतील पेट शॉप आणि गेमिंग झोनमध्ये आग लागल्याने या तरुणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.
आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या 14 गाड्या, ज्यामध्ये हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म वाहनाचाही समावेश होता, तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग लागली तेव्हा इमारतीमध्ये अनेक विद्यार्थी उपस्थित होते. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आणि संपूर्ण इमारतीमध्ये धुराचे प्रचंड लोट पसरल्यामुळे मुख्य जिन्यावरून बाहेर पडणे अशक्य झाले. त्यामुळे आत अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी अत्यंत थरारक पद्धतीने इमारतीच्या खिडकी आणि गॅलरीतून थेट खाली उड्या मारल्या. स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनी प्रसंगावधान राखत खाली उभ्या असलेल्या लोकांना वाचवण्यासाठी गाद्या व ताडपत्री धरली. या धावपळीत खिडकीतून खाली उडी मारल्यामुळे एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गंभीर दुर्घटनेची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकार्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्याचा प्रत्यक्ष आढावा घेण्याचे आदेश दिले. इमारतीत अडकलेल्या सर्व मुलांची सुरक्षा ही आमची पहिली प्राथमिकता आहे. बचाव कार्यात कोणतीही कसर सोडू नका आणि जखमींवर तात्काळ सर्वोत्तम वैद्यकीय उपचार सुनिश्चित करा, अशा कडक सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असून, इमारतीची अग्निशमन यंत्रणा आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्यास दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या इमारतीला अचानक आग लागल्याने इमारती ज्वाला आणि धुराचे लोट उटले त्यामुळे मोठा अफरातफर माजली. लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या खिडकी आणि जागा मिळून तेथून उड्या मारल्याने अनेकांचा मृत्यू झाला.सुरुवातीला ही घटना कोचिंग सेंटर आणि लायब्ररीत घडल्याचे म्हटले जात होता. मात्रनंतर पोलिसांनी सांगितले की इमारतीत कोणतेही कोचिंग सेंटर नव्हते. तळमजल्यावर पेट शॉप होते.
Massive fire at a coaching center in Lucknow
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…