नाशिक

अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांवर घरी जाऊन उपचार

नाशिक जिल्ह्यात सार्वत्रिक पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम

नाशिक : प्रतिनिधी
राज्यात वाढत्या कर्करोग, हृदयरोग, मधुमेह तसेच वृद्धापकाळाशी संबंधित दीर्घकालीन आजारांनी त्रस्त रुग्णांना उपचारांसोबतच सन्मानजनक व सर्वांगीण काळजी मिळावी, या उद्देशाने राज्य शासनाने सार्वत्रिक राज्य पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी नाशिक जिल्ह्यातही लवकरच करण्यात येणार असून, अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांवर घरी जाऊन उपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत राज्य, जिल्हा, तालुका, प्राथमिक व समुदाय स्तरावर पॅलिएटिव्ह केअर सेवा विकसित करण्यात येणार असून, प्रशिक्षित बहुविषयक मनुष्यबळ तयार करणे, वेदनाशामक औषधांचा अखंड पुरवठा, रुग्ण व कुटुंबीयांचे समुपदेशन, केअरगिव्हर प्रशिक्षण, जनजागृती तसेच घरपोच सेवांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, नागरी आरोग्य केंद्रे आणि आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.
जिल्हा रुग्णालयांमध्ये किमान 4 ते 6 बेड पॅलिएटिव्ह केअरकरिता राखीव ठेवण्यात येणार असून, रुग्णांना 24 तास नर्सिंग केअर, समुपदेशन, फिजिओथेरपी, आवश्यक औषधसाठा तसेच गृहभेटींची सुविधा दिली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे, प्रशिक्षित वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मॉर्फिनसारखी प्रभावी वेदनाशामक औषधे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.
या योजनेत केवळ कर्करोगच नव्हे, तर हृदय, यकृत, मूत्रपिंड व फुफ्फुस निकामी होणे, स्ट्रोक, पार्किन्सन, डिमेन्शिया, वृद्धांमधील दीर्घकालीन वेदना, बाल पॅलिएटिव्ह केअर, अपंगत्व तसेच दीर्घकालीन मानसिक आजारांचा समावेश करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वसामान्य व दुर्लक्षित घटकांतील रुग्णांना उपचारांपलीकडची मानवी, संवेदनशील आणि सन्मानजनक आरोग्य सेवा उपलब्ध
होणार आहे.

उपचार कालावधीत सेवा उपलब्ध
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. पॅलिएटिव्ह केअर सेवा केवळ आजाराच्या अंतिम टप्प्यापुरती मर्यादित न ठेवता, आजाराचे निदान झाल्यापासून संपूर्ण उपचार कालावधीत उपलब्ध होणार आहे.

अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना त्यांच्या घरी जाऊन उपचार करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे.जे रुग्ण दवाखान्यात उपचारासाठीही जाऊ शकत नाही किंवा दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी दिलासा म्हणून उपचार, सुश्रूषा सेवा, उपचार करण्यासाठी पॅलेएटिव्ह केअर सुरू करण्यात आली आहे. रुग्णांनी या पॅलेएटिव्ह केअरचा लाभ घ्यावा.
– राजेंद्र बागूल, आरेाग्य अधिकारी

Home treatment for bedridden patients

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

4 minutes ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

11 minutes ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

24 minutes ago

रखडलेला व्यापार करार

अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो 20 ते 22 ऑक्टोबर 2026 या कालावधीत भारत भेटीवर होते. त्यांच्या…

32 minutes ago

सप्तशृंगगडावर छबीना उत्सव साजरा

कावडधारक व तृतीयपंथीयांच्या उपस्थितीने गड दुमदुमला सप्तशृंगगड : प्रतिनिधी दसर्‍याला नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर सप्तशृंगगडावर काल…

41 minutes ago

गोदाघाटावर शंखनादाचा विश्वविक्रम

नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पवित्र गोदाघाटावर रविवारी (दि. 25) 517 वादकांनी एकाच वेळी सामूहिक शंखनाद…

49 minutes ago