filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0004,0.0000; brp_del_sen:0.3000,0.0000; motionR: null; delta:null; bokeh:0; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2621440;cct_value: 0;AI_Scene: (6, 0);aec_lux: 115.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 46;
पाच जण बचावले; आर्थिक मोठे नुकसान
लासलगाव : वार्ताहर
लासलगाव येथील सोहननगर परिसरात मंगळवारी दुपारी गॅसटाकीचा भीषण स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत पत्र्याच्या घरासह घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने घरातील पाच जण थोडक्यात बचावले आहेत. प्रचंड उकाड्यामुळे घरातील सदस्य घराबाहेर झाडाखाली बसले असल्याने मोठी जीवितहानी टळली.
सोहननगर येथील शंकर खैरे यांच्या पत्र्याच्या घरामध्ये अचानक गॅसटाकीचा जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज परिसरात दूरवर ऐकू गेल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. स्फोट इतका तीव्र होता की, घरातील भांडी, कपडे व इतर संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे परिसरातील काही झाडेही जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
दरम्यान, सिद्धवीर हनुमान मित्रमंडळाच्या टँकरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे आणखी मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे सोहननगर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Massive gas tank explosion in Sohannagar, Lasalgaon
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…