नाशिक

राजापूर-ममदापूर वनहद्दीत वन्यजीवांची गणना

नगरसूल : प्रतिनिधी
तालुक्यातील राजापूर-ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्रात वनविभागाने ठिकठिकाणी बौद्ध पौर्णिमेनिमित्त कॅमेरे व पाच पाणवठ्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावत वन्यजीवांची गणना केली. ट्रॅप कॅमेरे लावत वन्यजीवांचा संचार पाहिला. वनहद्दीत लावलेल्या लाइव्ह कॅमेरा, ट्रॅप कॅमेर्‍यांत हरणांसह तरस, लांडगे, मोर, निलगायींसह अनेक प्राणी व पक्षी कैद
झाले आहेत.
पावसाळ्यात निसर्गाचा अविष्कार तर उन्हाळ्यात प्रकाश झालेले माळरान अशी टोकाची स्थिती असलेल्या राजापूर, ममदापूसह पूर्व भागातील वनहद्दीतील संपूर्ण जंगलात वन्यप्राण्यांचा वावर वाढत आहे. या भागात वनविभागाचे साडेसात हजार हेक्टर वनक्षेत्र असून, पैकी साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर वनसंवर्धन राखीव प्रकल्प राबविण्यात आला आहे. यामुळे अनेक कामे होत आहेत, पण या कामामुळे अपेक्षित बदल जंगलात झालेला दिसत नाही.कडाक्याच्या उन्हामुळे आत्ताही संपूर्ण जंगल भकास झाले असून, पाण्यासाठी वन्यजीवांची भटकंती होताना दिसते. अर्थात, पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठे, गवताचे कुरण यामुळे काही प्रमाणात हरणांची सोय होत असल्यामुळे दोन वर्षांपासून हरणांचे स्थलांतर थांबल्याचे सांगितले जाते.
पावसाळ्यात सर्वत्र हिरवेगार जंगल, छोटे-मोठे बंधारे पाण्याने तुडुंब भरलेले अन् खळाळणारे पाणी लक्ष वेधून घेते. अशा निसर्गसंपन्न वातावरणात हरणांचे कळप मनमोहक वाटतात. याचमुळे अनेक पर्यटकदेखील येथे हरणे पाहण्यासाठी गर्दी करतात. हरणांसह इतर प्राण्यांची गणना करण्यासाठी बौद्ध पौर्णिमेला ममदापूर संवर्धन वनक्षेत्रामध्ये पाणवठे व विविध ठिकाणी ट्रॅप कॅमेरे व लिव्ह कॅमेरे बसवण्यात आले होते.
ममदापूर, राजापूर, सोमठाणजोश, देवदरी, खरवंडी, भुलेगाव, राहडी, पिंपळखुटे बुद्रुक, पिंपळखुटे तिसरे, जायदरे, आहेरवाडी, कुसमाडी राखीव वनातील पाणवठ्यावर कॅमेरे बसवले. पाणी पिण्यासाठी येणार्‍या वन्यजीवांची गणना करण्यात आली. यावेळी तरस, लांडगे, काळवीट, खोकड, मोर, मुंगूस, इतर वन्यजीवांची नोंद घेण्यात आली आहे. यावरून फक्त हरणेच नव्हे तर इतरही वन्यप्राणी या जंगलात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वनहद्दीत आढळलेले प्राणी    प्राणी संख्या
काळवीट                                              107
निलगाय                                                 9
सायाळ                                                   2
लांडगे                                                   21
खोकड                                                    8
मोर                                                      58
रानडुक्कर                                            30
तरस                                                      4
विविध पक्षी                                       150

Wildlife census in Rajapur-Mamdapur forest boundary

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

7 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

13 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

19 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

24 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

39 minutes ago

लैंगिक अत्याचार करणार्‍या दोघा फरार आरोपींना अटक

सातपूर : प्रतिनिधी पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मॅक्स कॅफे तसेच आई-वडील घरी नसताना…

46 minutes ago