मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत भेट
नाशिक : प्रतिनिधी
येत्या 2027 मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या सिंहस्थासाठी देशभरातून आठ ते दहा कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. या साधू-महंत व भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेने 15 हजार 173 कोटींचा आराखडा सादर केला होता; परंतु सिंहस्थ प्राधिकरणाने सरसकट आराखडा मंजूर न करता यातील काही कामांना प्रशासकीय मंजुरी दिली असल्याने कामे रखडली आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी मंत्री महाजन यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.21) मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी महापौर आडके यांनी मुख्यमंत्र्यांकडे अतिरिक्त निधी देण्याची मागणी केली असता
यावेळी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या काळात होणार्या प्रचंड गर्दीचा विचार करता शहरातील पायाभूत सुविधा सक्षम करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आगर टाकळी येथील रामदास स्वामी मठ देवस्थान विकसित करण्यात यावे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत मंजूर प्रकल्प निधी मिळावा, नाशिक महापालिकेस राज्य शासनाकडून येणे असलेले जमीन महसूल व बिनशेती कराची प्रलंबित रक्कम नगरनियोजन अंतर्गत 50 टक्के प्रीमियम चार्जेसमधून समायोजित करण्यात यावी, अशी मागणीही महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर विविध विकासकामांसाठी अतिरिक्त निधी देण्याची मागणी नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच आगरटाकळी येथील रामदास स्वामी मठ देवस्थान विकसित करण्यात यावे तसेच महापालिकेस राज्य शासनाकडून येणे असलेले जमीन महसूल व बिनशेती कराची प्रलंबित रक्कम नगर नियोजन अंतर्गत 50 टक्के प्रीमियम चार्जेसमधून समायोजित करण्यात यावी, अशी मागणीही महापौरांनी केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अतिरीक्त निधी मिळावा. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
Mayor demands additional funds from Chief Minister for Simhastha