गुन्हेगारांविरोधात पोलिस अॅक्शन मोडवर
पंचवटी : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांत वर्चस्व सिद्ध करण्यासाठी म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे मखमलाबाद, म्हसरूळ भागातील गुन्हेगारी व भाईगिरी कमी करण्याच्या दृष्टीने, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी म्हसरूळ पोलिस अॅक्शन मोडवर आले आहेत. सराईत गुन्हेगारांची कणसरा माता चौक, शांतीनगर आदी भागांतील बाजारपेठेतून धिंड काढली. यामुळेे नागरिकांकडून पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शांतीनगर, अश्वमेधनगर, चाणक्यपुरी सोसायटी, कणसरा माता चौक आदी भागांत वर्चस्व सिद्ध करण्यासाठी गुन्हेगारीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे बाजारपेठा व रहिवासी भागात सुरक्षितता वाढवणे, गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करून कायदा-सुव्यवस्था राखणे, स्थानिक नागरिकांत पोलिसांबद्दल विश्वास निर्माण व्हावा यादृष्टीने म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक पटारे, परदेशी, योगेश परदेशी, जी. सी. जोशी यांनी हर्ष प्रदीप काकडे (वय 20, रा. साईपुष्प अपार्टमेंट, ओमकार नगर, पेठ रोड), ओम खंडू आहेर (19, रा. गणेश अपार्टमेंट, वाढणे कॉलनी, म्हसरूळ), धनराज सदानंद गणेशकर (विद्यानगर, मखमलाबाद), उमेश प्रल्हाद खनपटे (रा. अश्वमेधनगर, म्हसरूळ), करण शांताराम आहेर, (रा. अश्वमेधनगर, म्हसरूळ) या सराईत गुन्हेगारांची कणसरा माता चौक, चाणक्यपुरी सोसायटी, शांतीनगर, अश्वमेधनगर आदी भागांतून धिंड काढली.
पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे स्थानिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटला आहे. पोलिसांबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.
नागरिकांनीदेखील पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असेे आवाहन करण्यात आले आहे.
येणार्या काळात कठोर मोहीम राबविणार
गुन्हेगारी, भाईगिरी यांसारखे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत.पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा, तसेच म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परिसर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नागरिकांनीदेखील पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले. येणार्या काळात म्हसरूळ परिसरात अशाच प्रकारच्या कठोर मोहिमा राबविण्याचे पोलिसांचे उद्दिष्ट आहे जेणेकरून म्हसरूळ परिसर गुन्हेगारीपासून मुक्त होईल.
– अंकुश चिंतामण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, म्हसरूळ पोलिस ठाणे
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…