नाशिक

रंगपंचमीच्या उत्सवात मंत्री गिरीश महाजनांचा धप्पा!

‘फिरी फिरी नाच’ या खान्देशी गीतावर धरला ठेका

नाशिक ः प्रतिनिधी
नाशिकमधील रंगपंचमीसाठीची रहाड संस्कृती प्रसिद्ध आहे. नाशिककर उत्सवप्रिय असल्याने खास रंगपंचमीला (दि. 8 मार्च) रहाडीत डुंबण्याचा मोह जलसंपदा आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनाही आवरला नाही. शनी चौक परिसरातील पेशवेकालीन रहाडीत त्यांनी धप्पा मारत पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी केली. यावेळी रंगपंचमीचा मनसोक्त आनंद लुटला. मंत्री महाजन यांच्यासह भाजपाच्या स्थानिक नेत्यांनीही हजेरी लावली होती. शहरातील विविध रहाडींत रंग खेळण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती.
जलसंपदा आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील विविध रहाडींवर रंगपंचमीचा आनंद घेतला. सिडको प्रभागातही नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी आयोजित केलेल्या वॉटर शोमध्येही ते सहभागी झाले होते. यावेळी महाजन यांनी खान्देशी गीतांवर ठेका धरला होता. तरुणाईने ’फिरी फिरी नाच’ या गीतावर ग्रुप डान्स करत रंगपंचमीचा आनंद लुटला.
संपूर्ण भारतात होळीनंतर दुसर्‍या दिवशी रंगपंचमी खेळली जाते; परंतु नाशिकमध्ये होळीनंतर पाच दिवसांनी येणार्‍या पंचमीला रंग खेळला जातो. जुने नाशिक, पंचवटी परिसरातील पेशवेकालीन रहाडींची रंगपंचमीला विशेष तयारी केली जाते. शहरात नऊ रहाडी आहेत. रंगपंचमीसाठी तरुणाईसह सर्वच जण उत्साही असतात.
पेशवेकाळापासून चालत आलेल्या रहाड परंपरेला रंगपंचमीच्या दिवशी मोठ्या उत्सवाचे स्वरूप येते. शहरातील विविध चौकांमध्ये पुरातन रहाडी खोदल्या जातात. त्याचे पूजन करून त्यात नैसर्गिक रंग भरले जातात. पाणी सोडले जाते. त्यानंतर रंगपंचमीच्या खेळाला सुरुवात होते. यावेळी शालिमार येथेही वॉटर शोचे आयोजन केले होते. यात सहभागी होण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली होती. अनेकांना रहाडीपर्यंत पोहोचणे गर्दीमुळे शक्य झाले नाही. त्यांंनी वॉटर शो, तसेच गोदावरी नदीत रंगपंचमीचा आनंद साजरा केला. यावेळी डीजे, पारंपरिक वाद्यांच्या तालावर तरुणाईसह आबालवृद्धांनी आनंद लुटला.

Minister Girish Mahajan’s surprise at the Rang Panchami festival!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

4 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

4 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

4 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

4 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

5 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

5 hours ago