निवडणुकीत पैशाचा वापर करण्यासाठी वाय,झेड, सिक्युरिटी ,ॲम्बुलन्स, टँकर आदींचा वापर
आमदार रोहित पवार यांचा आरोप
पंचवटी : सुनील बुनगे
लोकसभा निवडणूकीत महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांच्याकडून पैशाचा , दबावतंत्राचा अन् प्रशासनाचा वापर केला जात आहे. या निवडणुकीत पैशाचा वापर करण्यासाठी झेड सिक्युरिटी, वाय सिक्युरिटी , ॲम्बुलन्स, टँकर आदींचा वापर केल्याचा गंभीर आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला .
नाशिक , दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. त्यासाठी आज रोहित पवार यांची सभा होणार आहे. या सभेसाठी आले असता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. रोहित पवार यांनी सांगितले की, महाविकास आघाडी बलाढ्य शक्ती आहे .त्यामुळे त्यांच्याकडून पैसा , प्रशासन , दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. निवडणुकीत पैशाचा वापर करण्यासाठी वाय, झेड सिक्युरिटी, ॲम्बुलन्स टँकर आदींचा वापर देखील केला जात आहे. महायुतीकडून दोन हजार कोटी नेते , गुंड , मत विकत घेण्यासाठी वापरण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. बारामती , नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात अमाप पैशांचा वापर केला गेला. तर एकट्या बारामती मतदार संघात १५० कोटी रुपयांचा वापर झाल्याचेही ते म्हणाले . विशेष म्हणजे पैसे वाटप होत असताना पोलीसच सोबत असतील तर काय हे जनेतला विचारा असे देखील म्हणाले. नाशिक मध्ये मुख्यमंत्री दोन तासासाठी आले होते .जर दोन तासासाठी त्यांना नऊ बॅगा सोबत आणाव्या लागतं असतील तर काय बोलणार त्यामुळे त्या बॅगा कसल्या होत्या त्या असा प्रश्न देखील उपस्थित होतो .त्यावर पत्रकारांनी पवार यांना डॉ. सुजय विखे यांनी आम्ही कपड्याच्या बॅगा सुद्धा न्यायच्या नाही का असा प्रश्न उपस्थित केल्यावर रोहित पवार म्हणाले की , डॉ.सुजय विखे तर इंग्लिश बोलानारे आहेत ते कटिंग करण्यासाठी देखील परदेशात जातात त्यामुळे त्यांना बॅगा लागत असतील असे सांगितले. पण आम्ही कुठे एका दिवसाच्या दौऱ्यावर जाताना एकही बॅग सोबत नेत नाही असे म्हणाले.
राज्यात भाजपला केवळ १३ ते १४ जागा मिळतील असा अंदाज असून शिंदे गटाला २ ते ३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. अजित दादांना एकही जागा मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामूळे महायुतीला राज्यात केवळ १६ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज वाटतो . बारामती मधील सीसीटीव्ही बंद बद्दल विचारले असता पवार यांनी ४५ मिनिटे सीसीटीव्ही बंद होत असे सांगितले. त्यामुळे कुठेतरी चुकीच्या गोष्टी घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. नाशिक मध्येही ८०० कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा झाल्याचे समजले आहे . त्यामुळे मुख्यमंत्री तर ज्यांनी घोटाळा केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसत असल्याचे सांगितले. अजित दादांच्या मित्राचा देखील ८० कोटी रुपयांचा दुधाचा घोटाळा झाला असून हसन मुश्रीफ यांच्या कडूनही २०० कोटींचा घोटाळा झाल्याचे ते म्हणाले.
मोदींच्या सभेसाठी जागा बदलावी का लागली कारण ते शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जायला भित आहेत. महाराष्ट्रात मोदींच्या गल्लो गल्ली सभा होताना दिसत आहेत. मोदी शेतकरी अन् सर्वसामान्यांना घाबरले आहेत. त्यामुळे आता भाजपला अन् मोदींना सर्वसामान्य जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असेही पवार यांनी सांगितले. घाटकोपर मधील अनाधिकृत होर्डिंग्ज बाबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधान सभेत देखील आवाज उठवला होता पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रेल्वे पोलिसांची परवानगी नसताना अनाधिकृत होर्डिंग्ज कसे लावले असा प्रश्न देखील उपस्थित केला. घाटकोपरच्या होर्डिंगच्या दुर्घटनेत जवळपास १४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे समजते . तसेच जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणाची देखील चौकशी झाली नाही .
राज्य सरकारला जनतेशी काही देणं घेणं नाही त्यांना फक्त पैसा , कमिशन हेच पाहिजे आहे . या सरकारने अडीच वर्षात सुमारे २५ हजार कोटींचा घोटाळा केला असून स्वार्थासाठी बसलेल्यांना जनतेची किंमत राहिली नाही असेही पवार म्हणाले . यावेळी यावेळी आमदार सुनील भुसारा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड ,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, कार्याध्यक्ष दीपक गायधनी , युवक शहराध्यक्ष बाळा निगळ, युवक तालुकाध्यक्ष विष्णू थेटे, दीपक वाघ , निवृत्ती महाराज कापसे आदी उपस्थित होते.
भाजपचे मतदार बाहेर पडलेच नाही
गेल्या १० वर्षात काहीच काम झाली नसल्याने अंधभक्तांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही . राजकारणातील पातळी घसरत असल्याने सर्वसामान्य जनतेचा राजकारणावरील विश्वास उडत चालला आहे.
फडणविसांनी फक्त पक्ष अन् घर फोडण्याचे उद्योग केले त्यामुळे भाजपचेच लोक नाराज आहेत . त्यामुळे पुण्यात तसेच इतर ठिकाणी देखील भाजपचे मतदार बाहेर पडले नाही.
अजित दादांना कमळाशिवाय पर्याय नाही
लोकसभा निवडणुकीत भाजपला १३ ते १४ जागा मिळण्याची शक्यता असून शिंदे गटाला २ ते ३ जागा अन् अजित दादांना एकही जागा मिळणार नाही . लोकसभा निवडणुक झाली तर चिन्ह व पक्ष फ्रिज होण्याची शक्यता आहे . त्यामुळे अजित दादांना कमळ चिन्ह अन् भाजप शिवाय राहणार नाही .
बावनकुळेंचा फुगा फुटणार
महायुतीकडून पैशांचा , प्रशासनाचा व दबावतंत्राचा वापर होत आहे. परंतु सर्वसामान्य जनता स्वाभिमानी झाली आहे. सर्वसामान्य जनता महाविकास आघाडी सोबत आहे.
नाशिक , दिंडोरी लोकसभा निवडणुकीची जबाबदारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली होती . नाशिक अन् दिंडोरी लोकसभा ही महाविकास आघाडीकडेच राहणार असून बावनकुळेंचा फुगा फुटणार मात्र यावेळी फुटणार आहे
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…
दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…
नाशिक: प्रतिनिधी महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी वर्धा येथील जिल्हाधिकारी…
बराजकमल एंटरटेनमेंट'ची दमदार घोषणा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनित नवा मराठी चित्रपट…