नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
शत्रू राष्ट्राकडून देशावर हवाई हल्ल्याचा संभाव्य धोका निर्माण झाल्यानंतर घ्यावयाची काळजी, जनजागृती यासंदर्भात नागरी सुरक्षा दल विभागाकडून नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर रंगीत तालीम (मॉकड्रील) घेण्यात आली.
नागरी संरक्षण दल विभागाचे उपनियंत्रक देवेंद्र बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. 25) दुपारी रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर हवाई हल्ल्याचा संभाव्य धोका निर्माण झाल्यानंतर नागरी संरक्षण दलाकडून दोन मिनिटे चढउतार आवाजातील सायरन वाजवत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना प्रथमोपचार करून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आग विझविण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत करावयाची जनजागृती, नागरिकांनी घ्यायची दक्षता, कोणती कार्यपद्धती अवलंबावी हा मॉकड्रीलमागील उद्देश होता. मॉकड्रीलच्या बचाव कार्यात विमोचन पथकाचे अधिकारी मनोहर जगताप, अग्नी सुरक्षाप्रमुख रामसिंग बागूल, प्रथमोपचार प्रमुख मंगला काकड यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांनी काम पाहिले.
याते नागरी संरक्षण दलाचे क्षेत्ररक्षक मनोहर जगताप, योगेंद्र पाटील, शुभम क्षीरसागर, भूपेंद्र जाधव, माजी मुख्य क्षेत्ररक्षक डॉ. अनिल पाटील, डॉ. सुभाष काळे, पोलिसांचे जलद प्रतिसाद पथक, बॉम्ब शोधक-नाशक पथक, गृहरक्षक दलाचे जवान, रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी, कर्मचारी व पोलिस आदी सहभागी
झाले होते.
Mock drill at Nashik Road railway station
नाशिक : प्रतिनिधी दुष्काळी परिस्थितीचा सामना करणार्या नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांना राज्य शासनाकडून आर्थिक दिलासा मिळाला…
निफाड : तालुका प्रतिनिधी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेशी संलग्न असलेल्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये…
अंबड गुन्हे शाखा युनिट तीनची यशस्वी कारवाई सिडको : प्रतिनिधी वसतिगृहात राहून शिक्षण घेणार्या मुलींना…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र बाइक टॅक्सी नियम- 2025 अंतर्गत कोणताही अधिकृत परवाना नसताना शहरात अवैधरीत्या…
सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा शिंदे गटाला कोंडीत पकडणारा जोरदार युक्तिवाद नवी दिल्ली : प्रतिनिधी…
पुण्यात कोर्टाबाहेर गोळीबार पुणे : प्रतिनिधी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेट क्र. 4…