नाशिक : प्रतिनिधी
दुष्काळी परिस्थितीचा सामना करणार्या नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांना राज्य शासनाकडून आर्थिक दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील 4 लाख 49 हजार 573 शेतकर्यांच्या बँक खात्यांवर प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे एकूण 224 कोटी 78 लाख 65 हजार रुपयांचा दुष्काळी मदत अग्रीम वितरित करण्यात आला आहे. उर्वरित पात्र शेतकर्यांनाही मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे. मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी शेतकर्यांनी बँक खाते आधारशी संलग्न करून फार्मर आयडी तयार करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
तालुकानिहाय वितरणाचा विचार करता मालेगाव तालुक्यात सर्वाधिक 72 हजार 363 शेतकर्यांना 36 कोटी 18 लाख 15 हजार रुपये मिळाले आहेत. अद्याप मदत न मिळालेल्या पात्र शेतकर्यांसाठी पडताळणी आणि प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे.
आधार जोडणी, फार्मर आयडी आवश्यक
मदतीची रक्कम थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी शेतकर्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असल्याची खात्री करावी. तसेच फार्मर आयडी तयार करून घ्यावा. आधार जोडणी नसणे, बँक खात्यातील त्रुटी किंवा फार्मर आयडी उपलब्ध नसणे यामुळे मदत वितरणात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पात्र शेतकर्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून माहिती अद्ययावत ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तालुकानिहाय मदत वितरण
तालुका शेतकरी संख्या
मालेगाव 72,363
निफाड 56,296
बागलाण 52,667
येवला 51,639
सिन्नर 47,955
चांदवड 38,408
नांदगाव 36,203
देवळा 22,958
कळवण 19,593
सुरगाणा 14,577
इगतपुरी 14,406
त्र्यंबकेश्वर 12,981
पेठ 9,527
एकूण 4,49,573
दुष्काळी मदत अग्रीमपासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी आवश्यक पडताळणी आणि प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. शेतकर्यांनी बँक खाते आधारशी संलग्न करून फार्मर आयडी तयार करून घ्यावा.
– आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी
लिपिड प्रोफाइल आणि निरोगी हृदयाचे गुपित सध्याच्या बैठ्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढत…
गुलाबी थंडीची चाहूल लागली की, निसर्गासोबतच मानवी शरीरातही अनेक बदल घडू लागतात. आयुर्वेदाने वर्षाची सहा…
भूमीत माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळतो, त्या भूमीचा खरा आधार तिचे संविधान असते. डॉ.…
घरबसल्या नागरिकांकडून आरोग्याची काळजी नाशिक : प्रतिनिधी शहरात थंडीचा कडाका वाढू लागल्याने सकाळी लवकर घराबाहेर…
15 डिसेंबरपर्यंत सर्व विभागांना कृती आराखडे सादर करण्याच्या सूचना नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्यातील संभाव्य…