नाशिक

नाशिक-शिर्डी दुहेरी रेल्वेला गती

34 गावांतील जमिनी संपादनाच्या प्रक्रियेत, सिन्नरमधील 23 गावांचा समावेश

सिन्नर : प्रतिनिधी
नाशिकरोड ते साईनगर शिर्डी या प्रस्तावित दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून, जिल्हा प्रशासनाने त्यासाठी सक्षम प्राधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील 34 गावांमधील जमीन संपादित करण्यात येणार असून, त्यात सिन्नर तालुक्यातील 23 गावांचा समावेश आहे. संबंधित गटांची यादी सोमवारनंतर जाहीर होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
मध्य रेल्वेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन शाखेने कार्यवाही सुरू केली आहे. रेल्वे अधिनियम 1989 (सुधारित 2008) आणि केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सिन्नर तालुक्यातील गावांसाठी निफाडचे उपविभागीय अधिकारी, तर नाशिक तालुक्यातील गावांसाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांची सक्षम प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले की, 2013 च्या भूसंपादन कायद्यानुसार रेडीरेकनर दराच्या आधारे शेतकर्‍यांना मोबदला दिला जाईल. रेल्वे अधिनियमांतर्गत ही प्रक्रिया कमी कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन असून, गट क्रमांकांची यादी जाहीर होताच पुढील कार्यवाही सुरू होईल. दरम्यान, प्रस्तावित रेल्वेमार्गाची अंतिम लांबी, स्थानकांची संख्या किंवा त्यांची ठिकाणे अद्याप निश्चित करण्यात आलेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या यंत्रणेमार्फत मार्गाचे प्राथमिक आरेखन पूर्ण झाले असून, काही ठिकाणी फेरसर्वेक्षणानंतर किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे.

या गावांतून धावणार रेल्वे

प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी, वडझिरे, दातली, पाथरे खुर्द, दुसंगवाडी, खोपडी खुर्द, पांगरी खुर्द, मलढोण, खंबाळे, कुंदेवाडी, मांजरे, सिन्नर, फुलेनगर, ब्राह्मणवाडे, मुसळगाव, देशवंडी, जायगाव, पांगरी बु., वावी, सायाळे, पाटपिंप्री, बारागावपिंप्री, भोकणी आणि सुंदरपूर या गावांचा समावेश आहे. तर नाशिक तालुक्यातील विहितगाव, बेलतगव्हाण, चांदगिरी, जाखोरी, देवळाली, चेहेडी बु., संसरी, मोहगाव, बाभळेश्वर, पंचक आणि चाडेगाव ही गावेही प्रकल्पाच्या हद्दीत येणार आहेत.

Momentum for Nashik-Shirdi double railway line

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago