चार महिलांची नाशिक जिल्हा सुधारगृहात रवानगी
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहरातील उद्योग भवन परिसरातील साई डायमंड लॉज येथे अनैतिक देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीणच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम, 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार बाळकृष्ण शालीग्राम पजई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर तुकाराम ढगे, ऋषीकेश अण्णा जाधव, विशाल बाळू साळवे आणि शुभम दशरथ गिते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर चार महिलांची रवानगी नाशिक येथे महिला सुधारगृहात करण्यात
आली आहे.
पोलिसांनी शनिवारी (दि. 13) सायंकाळी साई डायमंड लॉज येथे छापा टाकला. तपासादरम्यान संबंधित आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहविक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा तसेच त्यांच्याकडून देहविक्री करून घेतल्याचा आरोप आहे.
कारवाईदरम्यान रोख रक्कम, कंडोमची पाकिटे, मोबाइल फोन, लॉजचे रजिस्टर तसेच इतर साहित्य असा सुमारे सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संध्या तेली, हवालदार ज्योती सरताळे, बाळकृष्ण पजई, करुणा आहेर, भूषण जोशी, माधुरी रेपाळे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, रमेश बोडके, योगेश मते, स्वप्नील केदार यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण करीत आहेत.
नाशिक ग्रामीणचे नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांच्या कर्मचार्यांकडून अन्य पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापेमारी करण्याची मोहीम सुरू केल्याची चर्चा आहे. तीन दिवसांपूर्वी वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदूरशिंगोटे येथे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर सिन्नर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर शनिवारी सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साई डायमंड लॉजवरील कथित देहव्यापार प्रकरणात नाशिक ग्रामीणच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने छापा टाकून कारवाई केली.
सलग दुसर्या वेळी बाहेरील पथकांकडून होत असलेल्या कारवाईमुळे संबंधित पोलीस ठाण्याच्या स्थानिक यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत चर्चा रंगू लागली असून, अवैध धंद्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.
स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह?
जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात कारवाईचा धडाका सुरू असताना संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या गैरप्रकारांबाबत स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आपल्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असतानाही स्थानिक पातळीवर प्रभावी कारवाई होत नसल्याचे चित्र दिसत आहे.
Raid on a lodge in Sinnar; case registered against four individuals for immoral trafficking.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…