मुलांना शाळेतून आणायला गेलेल्या मातेचा अपघातात अंत

क्रेटा कारचा चांदवडमध्ये थरार; तत्परतेमुळे जखमी तरुणाचे वाचले प्राण

चांदवड : वार्ताहर
शाळा सुटण्याची वेळ झाली होती… आपले पोटचे गोळे शाळेच्या गेटवर वाट पाहत असतील, या ओढीने लगबगीने पावले उचलणार्‍या एका मातेवर काळाने भीषण झडप घातली. चांदवड-निफाड रस्त्यावरील फुलेनगर परिसरात भरधाव क्रेटा कारने दिलेल्या धडकेत स्वाती कृष्णा कुंभार्डे (वय 29) या मातेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक तरुणही गंभीर जखमी झाला आहे. पोलीस निरीक्षकांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे त्याचे प्राण वाचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 24) दुपारी सव्वादोनच्या सुमारास स्वाती कुंभार्डे (रा. फुलेनगर, चांदवड) आपल्या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी पायी निघाल्या होत्या. त्याचवेळी भरत संजय सवेंद्रे (वय 35, रा. चांदवड) आपल्या स्कुटीवरून (एमएच 15- एके 1751) चांदवडकडून गणूरकडे जात होते.
फुलेनगर वाइन शॉपीसमोर पाठीमागून भरधाव पांढर्‍या क्रेटा कारने (एमएच 18-सीसी 7111) स्कुटीला आणि पादचारी स्वाती कुंभार्डे यांना जोरात उडवले. धडक इतकी भीषण होती की, स्वाती यांचा जागीच मृत्यू झाला, तर भरत सवेंद्रे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, हवालदार स्वप्नील जाधव व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेथील विदारक दृश्य पाहून निरीक्षक वाघ यांनी क्षणाचाही विलंब न लावता, रुग्णवाहिकेची वाट न पाहता स्वतःचे शासकीय वाहन जखमीच्या मदतीसाठी दिले. स्वतःच्या गाडीतून जखमी भरत सवेंद्रे यांना उपजिल्हा रुग्णालयात हलवल्यामुळे त्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली. पोलीस निरीक्षकांच्या या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. एका निष्पाप मातेच्या निधनामुळे त्या चिमुरड्यांचे छत्र हरपल्याने संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी चांदवड पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार स्वप्नील जाधव तपास करत आहेत.

Mother dies in accident while picking up children from school

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

खिशात नाही आणा…

खिशात नसताना पैशांचा गजर कशाला, दिखाव्याच्या दुनियेत खोटा हा साज कशाला आई-वडिलांच्या कष्टांवर उभारलेला हा…

9 hours ago

गुन्हेगारीच्या छायेत हरवणारा समाज…

खरंतर समाजात वावरताना वारंवार जाणवणार्‍या या वास्तवामुळेच हा विषय मांडावासा वाटला. कारण तो मांडणं ही…

9 hours ago

स्वमग्नता

अगं आई तो बघ! मावशींचा मुलगा कसे करतो आहे. तो जरा वेडा आहे का? हात…

9 hours ago

शेतीमातीची माणसं…

शेतीची माणसं म्हणजे काळ्या आईची लेकरं.. या काळ्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली असते. या…

10 hours ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात ऑनलाइन रोलेटचा सुळसुळाट

सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…

10 hours ago

वावी परिसराचा दुष्काळ हटणार

कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…

10 hours ago