नाशिक

तीस किलोमीटरचा फिल्मी स्टाइल पाठलाग

दोघा तोतया पोलिसांच्या आवळल्या मुसक्या

नाशिक : प्रतिनिधी
तब्बल तीस किलोमीटरचा फिल्मी स्टाइल पाठलाग करत पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघा तोतया पोलिसांना जेरबंद करण्यात अंबड गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. या दोन्ही सराईत तोतया पोलिसांनी विविध ठिकाणी गुन्हे करत नागरिकांना गंडा घातला आहे. त्यांच्याकडून 30 लाख रुपयांचे 201 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांच्या नावावर विविध पोलीस ठाण्यांत 58 गुन्हे आहेत. काल पोलीस आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत या गुन्हेगारांची कुंडलीच मांडण्यात आली. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून तोतया पोलिसांनी मोठा उच्छाद मांडला होता. यासंदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ 2) किशोर काळे व सहायक पोलीस आयुक्त (अंबड विभाग) सचिन बारी यांनी पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार 22 फेब्रुवारी 2026 रोजी अंबड पोलीस स्टेशनचे गुन्हेशोध पथक नियमित गस्त घालत असताना पाथर्डी फाटा परिसरात मोटारसायकलवरून फिरणारे दोन संशयित आढळले.
पोलीस अंमलदार मयूर पवार यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. संशयितांनी मुंबई-आग्रा महामार्गावरून पळ काढला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. तीस किलोमीटरपर्यंतचा हा थरारक फिल्मी स्टाइल पाठलाग सुरू होता. ओझर येथील उड्डाणपुलावर या दोघांना घेरण्यात आले. यावेळी पोलिसांशी इटापट करण्याचा प्रयत्न या दोघा आरोपींनी केला. मात्र, पोलिसांनी या दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
यावेळी त्यांच्या ताब्यातून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. अमजद अली अकबर अली बेग (वय 47, रा. भिवंडी, जि. ठाणे) व फयाज इम्तियाज अन्सारी (वय 28) अशी या दोघा तोतया पोलिसांची नावे आहेत.

सीसीटीव्हीचे विश्लेषण

या कारवाईत सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून आरोपींची हालचाल, वाहन, कपडे व देहबोलीचा अभ्यास करण्यात आला. त्याआधारे ओळख पटवून अटक करण्यात यश आले.

Thirty kilometer film style chase

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

खिशात नाही आणा…

खिशात नसताना पैशांचा गजर कशाला, दिखाव्याच्या दुनियेत खोटा हा साज कशाला आई-वडिलांच्या कष्टांवर उभारलेला हा…

11 hours ago

गुन्हेगारीच्या छायेत हरवणारा समाज…

खरंतर समाजात वावरताना वारंवार जाणवणार्‍या या वास्तवामुळेच हा विषय मांडावासा वाटला. कारण तो मांडणं ही…

11 hours ago

स्वमग्नता

अगं आई तो बघ! मावशींचा मुलगा कसे करतो आहे. तो जरा वेडा आहे का? हात…

11 hours ago

शेतीमातीची माणसं…

शेतीची माणसं म्हणजे काळ्या आईची लेकरं.. या काळ्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली असते. या…

11 hours ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात ऑनलाइन रोलेटचा सुळसुळाट

सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…

12 hours ago

वावी परिसराचा दुष्काळ हटणार

कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…

12 hours ago